हॅलो कृषी ऑनलाईन । (कृषी सल्ला) मराठवाडा विभागामध्ये पुढील 5 दिवसानंतर आकाश ढगाळ राहून उत्तर मराठवाडयात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे व कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 5 दिवसानंतर आकाश ढगाळ राहून उत्तर मराठवाडयात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे व कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. यापार्श्वभूमीवर मार्च महिन्यात पीक व्यवस्थापन कसं करावं याबाबत आपण आज तज्ज्ञांचा सल्ला जाणून घेणार आहोत. पीक व्यवस्थापन, फळबागा, भाजीपाला, फुलशेती, पशुपालन आदींची काळजी कशी घ्यायला हवीय याची सविस्तर माहिती आम्ही खाली दिली आहे.
हायटेक शेती करून असा कमवा दुप्पट नफा
मराठवाडयात दिनांक 03 ते 09 मार्च 2023 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 ते 11 मार्च 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
- वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी भुईमूग, मका, रब्बी ज्वारी व रब्बी सूर्यफूल पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी.
- मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी.
- कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे गहू पिकास दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे.
- गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत.
- कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.
- भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
- कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे केळी बागेत आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
- नविन लागवड केलेल्या केळी रोपांना सावली करावी.
- जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
- कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे आंबा बागेत आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
- नविन लागवड केलेल्या आंबा रोपांना सावली करावी.
- जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
- सध्या आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी.
- कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.
- भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
- कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
- काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
- टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या व्यवस्थापनासाठी ब्रोफ्लॅनिलीड 1.25 ग्रॅम किंवा सायॲन्ट्रानिलीप्रोल 18 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
असा मिळवा मोफत कृषी सल्ला –
शेतकरी मित्रांनो गुगल प्ले स्टोअरला जाऊन आजच Hello Krushi नावाचे अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या. इथे शेतीशी निगडित अनेक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. यामध्ये कृषी सल्ला, शेतीसंबंधी बातम्या, कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधन याबद्दल माहिती दिली जाते. तसेच सातबारा उतारा, जमीन नकाशा, बाजारभाव, हवामान अंदाज, सरकारी योजना, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री असा अनेक सुविधा Hello Krushi अँप वर देण्यात येतात. आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi डाउनलोड करून या सेवेचे लाभार्थी बना.
- काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी कडून बाजार पेठेत पाठवावी.
- कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे फुल पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
- सध्याच्या अचानक होत असलेल्या वातावरण बदलामध्ये (सकाळी थंडी तर दुपारी उष्ण वातावरण) या पासून लहान वयातील पशुधनाचे संरक्षण करणे महत्वाचे ठरते.
- मोठे पशुधन अनेक वेळा वातावरणातील बदलास सामोरे गेलेले असतात परंतू वासरे, करडे व कोकरे (नवीन जन्मास आलेली) हा बदल प्रथमत: अनुभवत आहेत. अशा सर्वांना सकाळी थंडी दुपारी उन्हापासून संरक्षणाची काळजी घ्यावी.
- विशेषत: गोठ्यामध्ये संरक्षणा बरोबरच उर्जायूक्त आहार देणे आवश्यक आहे. जेणे करून ते आपल्या शरीराची उब कायम ठेवतात.
- परजीवी आजारांची लागण होऊ नये यासाठी वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक व तिन महिन्यांच्या वासरांना व करडास/कोकरांना पट्टकृमीनाशक व रक्ती हागवण आजारावरील औषधीची मात्रा द्यावी.