हॅलो कृषी ऑनलाईन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (Krushi Swavalamban Yojana) ही महाराष्ट्र कृषी विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी (Scheme For Farmers) राबविण्यात येते. 30 सप्टेंबर 2024 ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. जाणून घेऊ या योजनेतील सुधारित निकष आणि योजनेची (Krushi Swavalamban Yojana) माहिती.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या (Irrigation Scheme) शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2017 पासून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषदेचा निधी वितरित करण्यात येतो. मात्र त्या तुलनेत या योजनेतील (Krushi Swavalamban Yojana) लाभ घेण्यास लाभार्थी इच्छुक नसल्याचे दिसून आल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी योजनेतील लाभ वाढविण्याचे प्रस्तावित केले होते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक तांत्रिक अटींमध्ये भरपूर सवलती देण्यात आलेल्या आहेत.
कृषी स्वावलंबन योजनेत झालेले बदल (Krushi Swavalamban Yojana Changes)
- मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे आता अनुसूचित जाती नव बौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरीसाठी 2.5 लाख ऐवजी चार लाख रुपये अनुदान (Vihir Anudan Yojana) मिळेल. तर जुन्या विहिरीच्या दुरूस्तीसाठी 50 हजार ऐवजी 1 लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल.
- या योजनेच्या लाभार्थींसाठी एक लाख पन्नास हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट काढून टाकण्यात आली आहे.
- नवीन विहीरीबाबत बारा मीटर खोलीची अट रद्द करण्यात आली आहे.
- शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 1 लाख ऐवजी 2 लाख मिळतील.
- इनवेल बोरिंग साठी 20 ऐवजी 40 हजार रुपये मिळतील.
- वीज जोडणी आकार 10 ऐवजी 20 हजार करण्यात आलेला आहे.
- विद्युत पंप संच साठी 20 ऐवजी 40 हजार रुपये
- सोलार पंपसाठी 30 हजार ऐवजी 50 हजार
- एचपीडीई पीव्हीसी पाईप साठी 50 हजार, तुषार सिंचन संच साठी 25 ऐवजी 47 हजार, ठिबक सिंचन संच साठी 50 हजार ऐवजी 97 हजार, तसेच तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन पूरक अनुदान देण्यात येईल.
- यातसुद्धा जमीन धारणेच्या प्रमाणात घसघशीत वाढ करण्यात आली आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय
अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या (Krushi Swavalamban Yojana) आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटक समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी यथे क्लिक करा.