हॅलो कृषी ऑनलाईन: महायुती सरकारची बहुचर्चित ‘लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) यावेळी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) गेम चेंजर मुद्दा ठरलेला आहे. या योजनेमुळे राज्यातील बहिणीने महायुतीला भरघोस मताने विजयी केले आहे. निवडणुकीत विजयी झाल्यावर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रूपये करण्यात (6th Installment) येईल असे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते. त्यामुळे आता राज्यातील सर्व भगिनींचे लक्ष या योजनेच्या (Ladki Bahin Yojana) 6 व्या हप्त्याकडे आहे. या अगोदर नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे सर्व पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत.
केव्हा मिळणार 6वा हप्ता?
महिलांना 2100 रुपयाचा हप्ता केव्हा मिळणार याबाबत उत्सुकता आहे. लवकरच महायुतीचे सरकार (Mahayuti Government) स्थापन होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर पहिल्या बैठकीतच 2100 रुपये हप्ता करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आहे (Ladki Bahin Yojana).
2100 रुपये हप्त्यासाठी कोणते निकष तपासले जाणार आहेत?
सरकारने हप्ता वाढविण्याची घोषणा केली असली तरी यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे आता या योजनेसाठी कडक निकष तपासले जाणार आहेत असे सांगण्यात येत आहे. यामध्ये उत्पन्नाचा दाखला, आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्तीवेतन, चारचाकी वाहने आणि पाच एकर पेक्षा कमी जमीन हे निकष तपासले जाणार आहेत. तसेच कुटुंबातील दोनच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
या योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) राज्य सरकार कडून 35,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे पुढचा हप्ता महिलांच्या खात्यात केव्हा जमा होतो हे पाहणे उत्सुकतेचे आहे.