Land Documents : तुमचाही जमिनीवरून वाद सुरु आहे का? ही ‘सात’ कागदपत्रे जपून ठेवाच!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागामध्ये शेतीवरून वाद (Land Documents) नाही. असा एकही शेतकरी सापडणार नाही. कोणाचा जमिनीवर मालकी हक्क (सातबाऱ्यावर नाव) असतो. तर ती जमीन कसत मात्र दुसराच असतो. अशी अनेक प्रकरणे गावाकडे पाहायला मिळतात. मात्र अशी परिस्थिती उद्भवल्यास आपण संबंधित जमीन आपल्याच मालकी हक्काची आहे. यासाठी काही महत्वाचे पुरावे (Land Documents) कायमस्वरूपी जपून ठेवणे महत्वाचे असते. जेणेकरून वाद निर्माण झाल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया, असे कोणते पुरावे आहेत. ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा मालकी हक्क सिद्ध करू शकतात.

1. खरेदी खत (Land Documents To Prove Land Ownership)

जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करणारा खरेदी खत (Land Documents) हा महत्वाचा पुरावा मानला जातो. या खरेदी खतावरून संबंधित जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते. खरेदी खत झाल्यानंतर ती माहिती फेरफारमध्ये लागते. त्यानंतर सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते.

2. जमीन मोजणीचे नकाशे (Land Survey Map)

जमिनीवरून वाद निर्माण झाल्यास संबंधित जमिनीची मोजणी केली जाते. यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असल्यास तुमचा त्या जमिनीवरील मालकी हक्क तयार होतो. त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे जपून ठेवणे अत्यंत आवश्यक असते. विशिष्ट गटाच्या नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. याशिवाय शेजारी लागून असलेल्या जमिनीचे गट क्रमांकही त्यात दिलेले असतात.

3. सातबारा उतारा

शेत जमिनीचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा (Land Documents) सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळेच दैनंदिन सरकारी कामकाजामध्ये त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या गाव नमुना सातबारामध्ये एखाद्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेले असते. त्यावरून जमिनीचा मालक कोण? हे समजण्यास मदत होते. सातबारा उताऱ्यामध्ये भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांची खरेदी-विक्री करण्यावर सरकारचे कोणतेही निर्बंध नाही. संबंधित शेतकऱ्याला त्या जमिनीबाबत सर्वाधिकार असतात. मात्र भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनीचे हस्तांतरण सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या ‘सरकार’ या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात. चौथ्या प्रकारात ‘सरकारी पट्टेदार’ जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वार दिल्या जातात.

4. खाते उतारा किंवा 8-अ

एखाद्या शेतकऱ्याची एखाद्या गावात एकूण जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असते. या सगळ्या गट क्रमांकांमधील शेत जमिनीची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर दिलेली असते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी 8-अ हा उतारा महत्त्वाचा दस्ताऐवज मानला जातो. राज्य सरकारच्या महसूल विभागाने 1 ऑगस्ट 2020 पासून डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ उतारा शेतकऱ्यांना ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे.

5. जमीन महसूलाच्या पावत्या

शेतकरी नेहमी आपल्या जमिनीचा महसूल तलाठ्यामार्फत भरत असतात. या भरलेल्या महसुलाच्या पावत्या या सुद्धा जमिनीच्या मालकी हक्काबाबत (Land Documents) महत्वाचा पुरावा मानला जातो. या पावत्या सांभाळून ठेवल्यास वेळ प्रसंगी त्याचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो. जेणेकरून तुमचा जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध होण्यास मदत होईल.

6. जमिनीचे यापूर्वीचे खटले

एखादी जमीन तुमच्या मालकीची असते. आणि या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला सुरु असेल. तर अशा खटल्यासंबंधित कागदपत्रे, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल पत्र इत्यादी कागदपत्रे जपून ठेवली पाहिजे. याचाही वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी करता येऊ शकतो.

7. प्रॉपर्टी कार्ड

बिगरशेती जमिनीवर (एनए) तुमची मालमत्ता असेल तर त्याच्या मालकी हक्काविषयीही सजग राहणे गरजेचे असते. बिगर शेतजमिनीवर मालमत्तेच्या हक्काविषयी (Land Documents) प्रॉपर्टी कार्ड हा सर्वात महत्वाचा पुरावा मानला जातो. जसे साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावाने किती बिगर शेतजमीन आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते. बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यवसायाची इमारत आहे. याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते.

error: Content is protected !!