Land Survey : जमीन मोजणी अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या (Land Survey) असते ती म्हणजे कागदावर (सातबारा) जमीन जास्त असते. मात्र शेती कसत असताना क्षेत्र कमी असल्याचे वारंवार जाणवते. पिकांची लागवड करताना वर्षानुवर्षे ही बाब लक्षात येते. पण माहिती अभावी शेतकरी आहे त्या जमिनीत (Land Survey) आपले पीक घेत असतात. मात्र आता तुमच्याही मनात शंका असेल की तुमची जमीन आजूबाजूला कोणाच्या ताब्यात आहे. तर तुम्ही भूमिअभिलेख विभागाकडे अर्ज करून आपली जमीन परत मिळवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही हा अर्ज कसा करू शकता…

कुठे मिळेल अर्ज? (Land Survey Process In Maharashtra)

जमिनीची मोजणी बोलावण्यासाठी तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवरून अर्ज करण्याची सोय झाली आहे. यासाठी सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे. या अँपवर तुम्ही स्वतः सॅटेलाईटच्या मदतीने अगदी मोफत अवघ्या 10 मिनिटांत तुमची जमीन मोजू शकता. जर तुम्हाला जमीन कमी किंवा जास्त भरतोय असे वाटत असेल तर शासकीय मोजणी बोलावण्यासाठी अँपवरच सुविधा आहे. यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतात.

  • पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या.
  • आता अँप ओपन केल्यानंतर होमपेजवर शासकीय योजना विभागात जाऊन जमीन मोजणी अर्ज असा पर्याय निवडा.
  • सर्वप्रथम तुम्हाला अर्जात तुमच्या जमिनीच्या स्थानाची माहिती अर्थात तालुका? जिल्हा कोणता? याची माहिती भरावी लागेल.
  • पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला “अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता” (सातबारा प्रमाणे) यामध्ये तुम्ही स्वतः अर्जदार असाल तर तुमचे नाव, गाव, तालुका, जिल्हा याबाबतची माहिती भरावी लागेल.
  • दुसरा कॉलम हा “मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील” याबाबत असणार आहे. यामध्ये तुम्हाला किती कालावधीत मोजणी करायची आहे, याची माहिती लिहावी लागेल. तुम्ही दोन महिने (अतितातडीची मोजणी), तीन महिने (तातडीची मोजणी) आणि सहा महिने (साधी मोजणी) यातील तुम्हाला अपेक्षित कालावधी टाकू शकता. मोजणी का करताय? याबाबत ‘मोजणीचा उद्देश’ नमूद करा. यात तुम्ही शेतजमिनीची हद्द जाणून घायची आहे किंवा शेजारील व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. असे लिहू शकता. आणि समोर तालुका, गाव, तुमच्या शेतजमिनीचा गट नंबर लिहा.
  • तिसरा टप्पा हा तुम्ही निवडलेल्या कालावधीनुसार तुम्ही किती शुल्क नमूद करावे लागणार आहे. यात तुम्हाला साध्या मोजणीसाठी एकरी 1 हजार रुपये शुल्क भरणा करावा लागणार आहे. तातडीच्या मोजणीसाठी एकरी 2 हजार रुपये भरावे लागणार आहे. तर अतितातडीच्या मोजणीसाठी एकरी 3 हजार रुपये भरणा करावा लागणार आहे. त्यासमोरच शुल्क भरणा केल्यानंतर आपला चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे.
  • चौथा टप्पा या “सातबारा उताऱाप्रमाणे जमिनीचे सहधारक” या असणार आहे. यामध्ये तुम्ही ज्या गट नंबरची मोजणी करत आहात. त्यातील सातबारा उताऱ्याप्रमाणे (पोटहिश्यासह) सर्वांची नावे, पत्ता आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांची संमती आहे, अशा संमतीदर्शक सह्या आवश्यक असतात. जमीन मालक एक असेल तर केवळ स्वतःचे नाव येईल. नावासमोर सर्वांचा पत्ता लिहावा.
  • पाचव्या टप्प्यात “लगतचे कब्जेदार यांची नावे आणि पत्ता” यामध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीच्या चारही दिशांना असणाऱ्या “लगतचे कब्जेदार शेतकऱ्यांची नावे आणि पत्ता” लिहावी लागतील. त्या-त्या दिशेनुसार ही माहिती भरावी.
  • सहाव्या आणि शेवटच्या टप्प्यात तुम्हाला “अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे वर्णन” दिले आहे. त्यानुसार तुम्हाला अर्जासोबत कागदपत्रे जोडाची लागणार आहे. यात प्रामुख्याने मोजणीचा अर्ज, मोजणी शुल्काचे चलन किंवा पावती आणि 3 महिन्यांच्या आतील सातबारा या कागदपत्रांची आवशक्यता असते.
  • याव्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या शेतातील घर, बंगला, उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 3 महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते.
  • आता आपली अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, तुम्ही भरलेला मोजणीचा अर्ज कागपत्रांसहित भूमिअभिलेख कार्यालयात जमा करा.
  • अर्ज जमा झाल्यानंतर सरकारच्या ई-मोजणी या प्रणालीमध्ये तो टाकला जातो. त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून तुम्ही नमूद केलेल्या कालावधी आणि क्षेत्रानुसारनुसार मोजणीसाठी किती फी लागणार आहे? याचे चलन जनरेट केले जाते. त्या चलनाची रक्कम तुम्हाला बँकेत जाऊन भरावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्या मोजणीचा नोंदणी क्रमांक तयार झाल्यांनतर तुम्हाला मोजणी अर्जाची पोहोच दिली जाईल. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारे कर्मचारी, त्यांचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते.
  • आतापर्यंत आपला ज्या अर्जाची माहिती घेतली तो आपल्याला ऑफलाईन उपलब्ध असतो. ज्यात शेतकऱ्यांना आपला खूप वेळ द्यावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून ‘ई-मोजणी’ अर्थात ऑनलाईन प्रक्रिया देखील राबवली जात आहे. त्यावर काम सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
error: Content is protected !!