Thursday, September 28, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Lashkari Ali : लष्करी अळीचे कीड व्यवस्थापन कसे करावे? ‘या’ महत्वाच्या गोष्टी समजून घ्या अन नुकसान टाळा..

Radhika Pawar by Radhika Pawar
February 13, 2023
in पीक माहिती, कीड व्यवस्थापन, विशेष लेख
lashkari ali kid vyavasthapan
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन । मका पिकावरील लष्करी अळी Lashkari Ali (स्पोडोप्टेरा फुगीपर्डा) ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका करणारी कीड असून जून २०१८ मध्ये तिचा भारतात सर्वप्रथम प्रादुर्भाव दिसून आला. या किडीमुळे मका पिकाचे नुकसान होत असते. सध्या खरीप हंगामात देखील या किडीमुळे मका पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या किडीच्या व्यवस्थापणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय करणे गरजेचे आहे.

खाद्य वनस्पती : ही किड बहुभक्षीय असून ८० पेक्षा जास्त वनस्पतीवर आपली उपजिविका करते. परंतू गवतवर्गीय पिके हे या किडीचे सर्वात आवडते खाद्य आहे. ही कीड सर्वात जास्त मका, मधू मका, ज्वारी यावर उपजिविका करतांना आढळून येते. हराळी, सिंगाडा, कापूस, रान मेथी, मका, ओट, बाजरी, वटाणा, धान, ज्वारी, सोयाबीन, ऊस, तंबाखू व गहू या पिकांवर वारंवार प्रादुर्भाव होतो. भाजीपाल्यामध्ये फक्त मधूमक्यावर नियमित प्रादुर्भाव असतो. परंतू इतर भाजीपाला, फळ पिकामध्ये सेप, अंगूर, संत्रा, पपई, पीच, स्ट्रॉबेरी व इतर फुलपिकाचे कधी-कधी नुकसान करते. किडीचा जीवनक्रम : लष्करी अळीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्थेमधून पूर्ण होतो. या अळीची ३० दिवसात एक पिढी पूर्ण होत असून अखंड खाद्य मिळाल्यास ३ ते ४ पिढ्या विविध वनस्पतीवर पूर्ण होऊ शकतात.

असा मिळवा मोफत कृषी सल्ला –

शेतकरी मित्रांनो गुगल प्ले स्टोअरला जाऊन आजच Hello Krushi नावाचे अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या. इथे शेतीशी निगडित अनेक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. यामध्ये कृषी सल्ला, शेतीसंबंधी बातम्या, कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधन याबद्दल माहिती दिली जाते. तसेच सातबारा उतारा, जमीन नकाशा, बाजारभाव, हवामान अंदाज, सरकारी योजना, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री असा अनेक सुविधा Hello Krushi अँप वर देण्यात येतात. आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi डाउनलोड करून या सेवेचे लाभार्थी बना.

Download Hello Krushi Mobile App

अंडी अवस्था : अंडी अर्ध गोलाकार असून पानावर एका समुहात १०० ते २०० अंडी देते. अंडी समूह केसाळ व राखाडी/भुऱ्या रंगाच्या लव किंवा मऊ केसाने झाकलेले असतात. अंडी देण्याचा कालावधी उन्हाळ्यात फक्त २ ते ३ दिवसाचा असतो. अळी पुर्ण वाढ झालेल्या अळीचे तोंडावर पांढुरक्या रंगाचे उलट्या वाय Y आकाराचे चिन्ह असते. तर मागील बाजूस शेवटी चौकोनात चार फुगीर गोल गडद किंवा हलक्या रंगाचे ठिपके असतात.

कोष अवस्था : चकाकणाऱ्या तपकीरी रंगाचे कोष सामान्यतः २ ते ८ सें.मी. खोल जमिनीत असतात. अळी स्वतः भोवती अंडाकृती, मातीचे कण व रेशीम धागा एकत्र करून मैल कोष तयार करते.

प्रौढ अवस्था : नरामध्ये समोरच्या पंखावर राखाडी व तपकीरी रंगाच्या छटा असून टोकाला व मध्य भागाजवळ त्रिकोणी पांढरे ठिपके असतात. मादीमध्ये समोरचे पंख नरापेक्षा कमी चिन्हांकीत असून त्यावर राखाडी व तपकरी रंगाचे ठिपके असतात. मागील दोन्ही पंख मोहक चंदेरी पांढरे असून त्यावर आखुड गडद रंगाची किनार असते.

पतंग अवस्था : सरासरी १० दिवसाची असून ती ७ ते २१ दिवसापर्यंत असू शकते. प्रौढ निशाचर असून मादी सामान्यतः बहुतांश अंडी पहिल्या चार पाच दिवसाच्या कालावधीत देते.

नुकसान : अळ्या पाने खाऊन पिकाचे नुकसान करतात. नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या पानाचा हिरवा पापूद्रा खातात. त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडतात. दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानाला छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात. अळ्या मक्याच्या पोंग्यामधे राहून पानाला छिद्रे करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर सरळ एकसमान छिद्रे दिसतात. सर्वसाधारण एका झाडावर एक किंवा दोन अळ्या राहतात, कारण त्या जवळ आल्यास एकमेकांना खातात. जुनी पाने मोठ्या प्रमाणात पर्णहीन होऊन पानाच्या फक्त मध्य शिरा व व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते. झाड फाटल्यासारखे दिसते पोंगा धरण्याची सुरूवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते, मध्यम पोंगे अवस्था त्यापेक्षा जास्त तर उशीरा पोंगे अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते. अळी काही वेळा कणसाच्या बाजुने आवरणाला छिद्र करून दाणे खाते. दिवसा अळी पोंग्यात लपून राहते.

लष्करी अळीचे कीड व्यवस्थापन कसे करावे? Lashkari Al

मशागतीय पध्दती –

  • स्वच्छता मोहीम राबवावी व नत्र खताचा वापर टाळावा.
  • पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत एकरी २० या प्रमाणे पक्षी थांबे उभारावे (३० दिवसापर्यंत).
  • मका बियाण्यास सायंट्रेनिलीप्रोल १९.८ + थायोमेथोक्झाम १९.८ टक्के एफ. एस. ६ मि.ली. प्रति किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी.

यांत्रीक पद्धती –

  • पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत पानावरील समुहात दिलेली अंडी किंवा अळ्यांचा समूह असलेली प्रादुर्भावग्रस्त पाने (पांढरे चट्टे असलेली) अंडी/अळ्यांसहीत नष्ट करावी.
  • प्रादुर्भाव दिसताच प्रादुर्भावग्रस्त पोंग्यामधे सुकलेली वाळू टाकावी.
  • पतंग मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा
  • एकरी पंधरा याप्रमाणे वापर करावा, सापळे पिकाच्या घेराच्या उंचीवरोवर प्राधान्याने सुरूवातीच्या पोंगे अवस्थेत लावावे.

जैविक नियंत्रण : रोपे ते सुरूवातीची पोंगे अवस्थेत ५ टक्के पोंग्यामध्ये तसेच १० टक्के कणसामध्ये प्रादुर्भाव आढळल्यास जैविक किटकनाशकांची फवारणी करावी. * बॅसीलस थुरीजीअसीस व कुर्सटाकी २० ग्रॅम / १० लि. पाणी किंवा ४०० ग्रॅम / एकर याप्रमाणे फवारणी करावी.

रासायनिक किटकनाशकांचा वापर : फवारणी सायंकाळी किंवा सकाळी करावी. तसेच द्रावणाचे जाडसर तुषार पोंग्यामध्ये पडेल अशा प्रकारे फवारणी करावी म्हणजे अळ्यांचे प्रभावी नियंत्रण करता

Tags: Lashkari Alilashkari ali kid vyavasthapanMaka
SendShareTweet

ताज्या बातम्या

Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
Crop Management

Crop Management : सुधारित बी-बियाणे, खते आणि पीकसंरक्षके तसेच संप्रेरके या संदर्भातील माहिती देणाऱ्या संस्था कोणत्या? जाणून घ्या

September 25, 2023
Spinach Farming

Spinach Farming : पालकाच्या ‘या’ जाती पिकवल्या तर मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

September 25, 2023
Agriculture News

मुख्यमंत्रांनी घेतला मोठा निर्णय! दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन चारा पिकांसाठी काढला जीआर

September 24, 2023
मोदी आवास घरकुल योजना

मोदी आवास घरकुल योजना काय आहे? कोणकोण मिळू शकतं स्वतःच घर? जाणून घ्या फायद्याची गोष्ट

September 24, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group