Leaf Farming : राज्यात पानांची शेती शक्य, पानांमध्ये पोषण मूल्य अधिक; संशोधकांचा दावा!

Leaf Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य फळे, फुलांच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे. आता राज्यात पानांची शेती (Leaf Farming) होऊ लागली आहे. फळांपेक्षा पानांत जास्त पोषण मूल्य असल्यामुळे शेवगा, आंबा, पेरू, जांभळाच्या पानांच्या पावडरला बाजारातून मागणी वाढत आहे. राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. कैलास कांबळे आणि श्रेयस डिंगारे यांनी “पानांसाठी फळबागा : शेती उत्पन्नाचा नवीन स्त्रोत” या विषयावर एक शोधनिंबध सादर केला असून, त्यात भविष्यातील पानांच्या शेतीमधील (Leaf Farming) संधीची माहिती देण्यात आली आहे.

झाडांना येतात वर्षभर पाने (Leaf Farming)

फळबागांनी आर्थिक उत्पन्नाबाबत शेतकऱ्यांना मोठा (Leaf Farming) दिलासा दिला आहे. पण, फळे विशिष्ट हंगामातच येतात. कीड, रोगांचा प्रादुर्भाव, पाऊस, वादळी वारे, काढणी, बांधणी, वाहतूक आणि साठवणूक करेपर्यंत फळांचे मोठे नुकसान होते. गारपिटी सारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये फळबागांचे अतोनात नुकसान होते. फळे नाशवंत असतात, त्यांचा वेळेत उपयोग न झाल्यास फेकून द्यावी लागतात. त्या तुलनेत फळ झाडांना वर्षभर पाने असतात.

पावडरमध्ये असतात औषधी गुणधर्म

अनेक फळ झाडांची वाढ नैसर्गिक पद्धतीने होत असते. पानांची वाढ होण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाही. फारसा आर्थिक खर्च येत नाही. पाने वर्षभर सहजासहजी उपलब्ध होतात. तसेच झाडांनी म्हणजेच पानांनी तयार केलेली अन्नद्रव्ये किंवा पोषण मूल्य (Leaf Farming) फळांमध्ये जात असतात. पण, संशोधनातून असे आढळून आले आहे की, फळांपेक्षा पानांमध्ये जास्त पोषण मूल्ये, औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे पाने वाळून, त्याची पावडर करून सामान्य तापमानात साठवणूक करता येते. गरजेनुसार आहारात उपयोग करता येतो.

किती मिळतो पावडरला दर?

मागील काही वर्षांत शेवगा, आंबा, पेरू, जांभूळाच्या पानांच्या पावडरला मागणी वाढली आहे. एक हजार ते अडीच हजार प्रति किलो दराने ही पावडर विकली जात आहे. आयुर्वेदिक औषध निर्माण कंपन्यांनी पानांच्या पावडरपासून तयार केलेली अनेक औषधे बाजारात आणली आहेत. त्यामुळे फळ झाडांची पाने हा शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देणारा नवा स्त्रोत निर्माण झाला आहे, असा दावाही शोध निबंधात करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत

वनस्पतीची पाने सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात. फळे, फुले पोसण्यासाठी त्याचच वापर होते. पण, पानांतील सर्व अन्न, पोषण मूल्ये फळांमध्ये येत नाहीत. आंबा, पेरू, जांभूळ, शेवगा, सीताफळ, लिंबूवर्गिय फळझाडे, कडूनिंब सारख्या झाडांच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म आहेत. अत्यंत मौल्यवान पाने जमिनीवर पडून वाया जातात. पण, त्यावर प्रक्रिया करून पावडर किंवा अर्क तयार केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होईल. असेही याबाबत सांगण्यात आले आहे.