जाणून घ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या लाल भेंडीच्या लागवडीची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्याकडे रोजच्या आहारामध्ये भेंडी ही भाजी असतेच. पण लाल रंगाची भेंडी तुम्ही कधी पहिलीये का ? हिरवी भेंडी तुम्हाला लाल रंगाची भेंडी म्हणून जर बाजारात मिळाली तर तुम्ही आश्चर्यचकित होणार पण ही गोष्ट खरी आहे. भारतीय भाजीपाला अनुसंधान संस्था, वाराणसी (उत्तर प्रदेश) च्या माध्यमातून नवीन वाणाचे संशोधन केले आहे. ज्यामध्ये भेंडीच्या फळाचा रंग लाल आहे, त्यामागे कारण हे ,कि तुम्ही जी भेंडी खाता त्या भेंडीमधून जर तुम्हाला जास्तीचे पोषक घटक मिळाले तर तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. या लाल भेंडी मध्ये अॅन्थोसायानीन नावाचे अँटिऑक्सिडंट खाण्यास मिळाते, ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढते.या नवीन भेंडीची जर शेतकऱ्याने लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव मिळू शकतो तसेच शेतकरी या वाणाची परदेशी निर्यात सुद्धा करू शकतो. तर चला या नवीन वाणाच्या लागवडी संदर्भात माहिती घेवूयात.

जमीन व हवामान

लाल भेंडीची लागवड करण्याकरिता उष्ण व समशीतोष्ण वातावरण पोषक, पोयट्याच्या जमीन उत्तम असतात.

वाण

कशी-लालिमा

संशोधन केलेली संस्था

–भारतीय भाजीपाला अनुसंधान संस्था, वाराणसी (उत्तर प्रदेश)
–संशोधन पूर्ण झालेले वर्ष;- ५ फेब्रुवारी २०१९
–फळातील अॅन्थोसायानीनचे प्रमाण:- ३-३.६ मिली ग्रॅम/१०० ग्रॅम वजन (हिरव्या भेंडी फळामध्ये खूप कमी असते)

फळातील मिनरल/खनिज द्रव्ये उपलब्धता प्रमाण

लोह: ५१.३ पी.पी.एम, झिंक:-४९.७ पी.पी.एम, कॅल्शियम:-४७६.५ पी.पी.एम

लागवड

–खरीप-जुलैचा पहिला आठवडा (१५ जून ते १५ जुलै)
–उन्हाळी:-जानेवारीचा तिसरा आठवडा (१५ जानेवारी ते १५ फुब्रूवारी)

बियाणे प्रमाण- १२-१५ किलो/हेक्टर

बीजप्रक्रिया- पेरणीपुर्वी १-२ ग्रॅम कार्बेन्डेंझीम व २ ग्रॅम थायरम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा + २५ ग्रॅम अझोस्पिरीलम ब्रासिलेन्सी किंवा अॅस्पेरजीलस अवमोरी प्रति किलो बियाण्याला चोळावे.

लागवड अंतर:- ३० × १५ सें.मी.

खतमात्रा

शेणखत २० टन प्रती हेक्टर पूर्वमशागत करताना, रासायनिक खताची मात्रा १०० किलो नत्र, ५० किलो स्पुरद व ५० किलो प्रती हेक्टर दयावी.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

–सेंद्रिय खते:- २० टन शेणखत प्रती हेक्टर
–जीवाणू खाते:- अॅझोटोबॅक्टर व स्पुरद विरघळणारे जीवाणू २५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळावे.
–खते देण्याची वेळ:-१) सेंद्रिय खते पेरणीपूर्वी: १५ दिवस अगोदर द्यावीत.
–रासायनिक खाते: १०:५०:५० नत्र:स्पुरद:पालाश किलो प्रती हेक्टर. अर्धे नत्र: संपूर्ण स्पुरद: पालाश पेरणीच्या वेळी ध्यावे व उर्वरित ५० किलो नत्र तीन समान
हफ्त्यामध्ये विभागून ३०, ४५ व ६० दिवसांनी द्यावे.

जीवाणू खाते बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.

माती परीक्षणानुसार सुक्ष अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीत फेरस सल्फेट, झिंक सल्फेट प्रत्येकी २० किलो प्रती हेक्टर + बोरॅक्स ५ किलो प्रती हेक्टर पेरणीच्या वेळी जमिनीतून किंवा फेरस सल्फेट + झिंक सल्फेट ०.५ % बोरिक अॅसीड ०.२ % पेरणी नंतर ३० ते ४५ दिवसांनी फवारावे.

संजीवकांचा वापर

१. जिबरेलिक ऍसिड १० पी. पी. एम. फवारल्यास हिरव्यागार व लुसलुशीत भेंडी मिळतात.
२. फळ तोडणीच्या एक दिवस अगोदर एन. ए. ए. २० पी. पी. एम. व अल्ट्राझाईम १०० पी. पी. एम. फवारल्यास दूरच्या बाजारपेठेत पाठविताना भेंडी लुसलुशीत राहते.

आंतरमशागत

२-३ वेळा खुरपण्या करून झाडांना भर द्यावी. मजुरांची टंचाई असल्यास बासालींन तणनाशक २-२.५ लिटर ५००लिटर पाण्यातून पेरणीपूर्वी फवारावे.तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.तणनाशकाचा फावरणीनंतर ७ दिवसांनी पेरणी करावी. फळे येण्याच्या वेळेस रोपांना भर द्यावी. सरीमध्ये गवताचे किंवा भाताच्या पेंढ्याचे किंवा पालापाचोळ्याचे किंवा रंगीत प्लॅस्टिकचे आच्छादन घालावे. यामुळे जमिनीतील ओलावा जास्त दिवस टिकून राहतो व तणाचा त्रास कमी होतो.

पाणी व्यवस्थापन

खरिफ हंगामामध्ये लागवड असल्या कारणाने पाण्याची गरज भासत नाही, जर पुसणे टन दिलाच तर दोन पाण्याच्या पाळ्या बसायला हव्यात.

काढणी

पेरणी नंतर ३५-४५ दिवसात फुले येतात व त्यानंतर ५-६ दिवसात फळे तोडणी योग्य होतात. कोवळ्या फळाची काढणी तोडा सुरु झाल्यास २-३ दिवसाच्या अंतराने करावी.तोडणीसाठी म. फु.कृ. विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या भेंडी हार्वेस्टचा वापर करावा.निर्यातीसाठी ५-७ सेमी लांब कोवळी एकसारखी फळाची तोडणी करावी. काढणी सकाळी लवकर करावी. काढणी नंतर शून्य ऊर्जा शीत कक्षा मध्ये भेंडीचे पूर्व शीतकरण करावे.

उत्पन्न:- १५-२० टन प्रती हेक्टर.

Leave a Comment

error: Content is protected !!