हळद काढणी तंत्रज्ञान, हळद शिजवण्याची पारंपरिक आणि आधुनिक पद्धत , फायदे आणि तोटे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आजच्या लेखात आपण हळद काढणी आणि हळद शिजवण्याची पारंपरिक आणि आधुनिक पद्धत तसेच त्याचे तोटे आणि फायदे याबाबत माहिती घेणार आहोत.

१) हळद काढणी:

  • हळद काढण्याच्या अगोदर खालील माहिती असणे आवश्यक आहे.
  • बेने लावल्यापासून 8 ते 9 महिन्यांनी पिक काढणीस तयार होते. पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात.
  • काढणी साधारण फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत चालते.
  • पिकाची काढणी करण्यापूर्वी 15 दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे.
  • जमीन थोड ओलसर असल्यास कंद काढणे सोपे जाते. कंद काढण्यापूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापुन घ्यावी.
  • कुदळीने कंद काढून त्यातील जेथे गड्डे वेगळे करावे.
  • कान्दावरील मुले कापावे व माती स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.
  • काढणीच्या वेळी गड्ड्याना खरचटणे व जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • प्रत्येक झाडापासून सरासरी 10 ते 20 कान्याकंद मिळतात.

2) हळदीचे उत्पादन:

हळदीच्या कंदाचे उत्पादन प्रती हेक्टरी 300 ते 400 क्विंटल मिळते.35ते 40 क्विंटल मातृकांदाचे उत्पादन मिळते.

महाराष्ट्रात तसेच माराठवाड्यात सर्वात जास्त सेलम या वाणाचा उपयोग केला जातो.
तसेच मागील 2 ते 3 वर्षात प्रभा, प्रतिभा व कृष्णा या वाणाचा वापर वाढला आहे.

3) हळद प्रक्रिया (शिजवणे)

अ) पारंपारिक पध्दत*

  • पारंपारिक पध्दतीमध्ये गुळ तयार करण्याच्या उथळ कढइचा (कहालीचा) वापर करतात.
  • कढईत कंद भरल्यानंतर पाला, गोणपाट, माती, शेणाचा थर टाकून वरचे तोंड बंद करावे लागते.
  • कढईत मध्यभागी हळदीच्या कंदाची उंच रस करतात.
  • तसेच कढइच्या काठाखाली 4 ते 5 cm पाणी भरतात, पहिल्या आधनास साधारण 2.5 तास लागतात.

हळद शिजत असतांना त्यामधून पांढऱ्या रंगाची वाफ पडून विशिष्ट वास आल्यावर एखादी अनिकुचीदार काडी हलकुंडात आरपार जात असेल तर हळद शिजली असे समजावे.

  • हळद चांगली शिजली असताना हलकुंडाचा कडकपणा व उग्रवास कमी होतो.
  • हलकुंडाला एकसारख रंग येतो. तसेच वाळवनीला वेळ कमी लागतो.

पारंपारिक पध्दतीचे तोटे:

–इंधन व वेळ ज्यास्त लागतो.
–तळातील हळद ज्यास्त शिजते, मधली हळद छान शिजते व शेंड्यावरची हळद कमी शिजते.
–शेनामातीचा वापर केल्याने हळदीचा अन्नामध्ये वापर करण्यास मर्यादा येऊ शकते.
–लाकड्याच्या दाताळयाने हळद कढईतून काढल्यामुळे खरचटली जाते व वाळविताना हळदीचा पिवळेपणा कमी होतो.

ब) सुधारित पध्दत: (CFTRI) (केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था विकसित)

  • या पध्दतीमध्ये हळद कंद स्वच्छह धुवून, मूळ्या कापून घेतात.
  • गड्डे काढल्यापासून 2-3 दिवसात प्रक्रिया करावी. डीझेलच्या टाक्यापासून 1.5 फुट उंची व 2 फुट व्यासाचे सच्छिद्र ड्रम बनून घ्यावे.
  • एका ड्रममध्ये 45 ते 50 किलो कच्ची हळद भरावी व कढइला झाकण लावावे.
  • हलद शिजविताना त्यामध्ये 0.05 ते 0.1 % सोडियम कार्बोनेट व 60 किलो
  • ओल्या हळदीसाठी 20 ग्रॅम सोडियम बायसल्फाईट व 20 ग्रॅम हायड्रोक्लोरिक अॅसिड टाकावे.
  • 20 ते 25 मिनिटे शिजवल्यानंतर एखादा तुकडा हाताने काढून हाताच्या अंगठ्याने वरची साल काढून पाहतात. साल जर सहज निघाली तर हळद शिजली असे समजावे.
  • काहीजण एखादी गवताची काडी शिजण्याऱ्या हळदीच्या तुकड्यामध्ये टोचून आरपार गेली तर हळद शिजली असे समजतात.
  • हळद शिजलेली असते त्यावेळेस पाण्याचे तापमान 98 ते 100 अंश से. असते.
  • हळद शिजवल्यानंतर बांबू ड्रमच्या कड्यामध्ये अडकवून ड्रम दोन व्यक्तीकडून कमी कष्टात उचलून बाजूला करीता येतात.
  • कढइची बुडाची बाजू सोडून इतर बाजूवर तापमान रोधक आच्छादन केल्यास व सच्छिद्र ड्रम ठेवल्यानंतर कढइचे तोंड पुन्हा कच्ची हळद भरून बंद करावे.
  • म्हणजे इंधनाचा योग्य वापर होऊन हळद शिजवण्याचा वेळ काम होऊ शकेल.

सुधारित पध्दतीचे फायदे

  • हळद एकसारखी शिजते.
  • पॉलीश केल्यावर हळदीला आकर्षक पिवळा रंग येतो.
  • गरम पाणी पुन्हा वापरल्याने इंधनाची व वेळेची बचत होते.
  • शिजवतांना पाण्यातील माती हळकुंडावर जमा होत नाही.
  • शिजवायला ठेवणे व बाहेर काढणे सोपे जाते.

Leave a Comment

error: Content is protected !!