संपूर्ण जिल्ह्यात धास्ती ! एकीकडे धावत्या वाहनचालकांवर बिबट्याचा हल्ला ; दुसरीकडे नरभक्षक वाघाची दहशत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :गडचिरोलीच्या कोरची भागात बिबट्याचा हैदोस सुरू आहे. दोन हल्ल्यात दोन इसम जखमी झाले. गडचिरोली जिल्ह्यात एक नरभक्षक वाघ व 1 बिबट्याने हैदोस घातलेला आहे.आज कोरची मार्गावर बिबट्याने हल्ला करून एक दुचाकीस्वाराला जखमी केले. आज पहाटे बिबट्याने नागपूरवरून गडचिरोली कोरचीकडे येणाऱ्या पेपर गाडीवर हल्ला केला. या पेपर गाडीच्या चालकाला उजव्या बाजूला दुखापत झाली असून गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक उपचार करून नागपूर येथे पुढील उपचारासाठी या चालकाला पाठवण्यात आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आज कोरची कुरखेडा मार्गावर दोन घटना घडल्या. या घटनांमुळं स्थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुचाकीचालक गाडीने जंगलाच्या रस्त्यातून जात आहे. समोरून आधीच एक दुचाकी गेली. त्यापाठोपाठ दुसरी दुचाकी जात आहे. अचानक बिबट्याने उंच झेप घेतली. हा बिबट्या त्या गाडीचालकाच्या अंगावर तुटून पडला. गाडीचालकाला पाडून त्यानं पुढील मार्ग शोधला. तोपर्यंत दुचाकीचालक गाडीवरून खाली पडला. तो जखमी झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनांमुळं वन्यप्राण्यांची भीती अधिकच वाढली आहे. रस्त्यावरून ये-जा करायची नाही काय, असा प्रश्न लोकं विचारत आहेत. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

दुसरीकडं, देसाईगंज तालुक्यात वाघाने हैदोस घातला. नरभक्षक वाघामुळं नागरिक हैराण आहेत. आरमोरी तालुक्यातही दोघांचा वाघाने बळी घेतला. त्यामुळं या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!