जाणून घेऊया थंडीमुळे होणारे पिकांवरील परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी नव्हे अशा बेभरवशाच्या निसर्गाने यंदा शेती आणि शेतकऱ्याला प्रचंड फटका दिला. उन्हाळा पावसाळा आणि आता हिवाळ्यातही वातावरण बदलाच्या संकटाने शेतकऱ्याची पुरती अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे. वाढत्या थंडीचा आणि वातावरण बदलाचा मुकाबला शेतकऱ्यांनी कसा करावा? थंडीचा जोर वाढणार! अशा वेळी शेतकऱ्यांनी पिकांची काय काळजी घ्यावी ? असा प्रश्‍न साहजिकच उपस्थित होतो.

बदलत्या वातावरणामुळे पिकांवर त्याचा परिणाम जाणवत आहे.यामुळे शेतकरी हैराण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजरी लावल्याने द्राक्ष,डाळींब या फळबागांचे नुकसान झाले होते.बदलत्या वातावरणात कधी जास्त उन्ह जाणवत आहे.तर कधी जास्त थंडी याचा परिणाम पिकांवर झाला आहे.हवामानात बदल होत असल्याने अचानक ढगाळ वातावरण ही निर्माण होत आहे.त्यामुळे शेतकरी चिंतेत असून या वातावरणामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. वाढत्या थंडीत शेतकऱ्यांनी पिकांची काय काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी थंडी पासून संरक्षणासाठी फळबागांना आणि पिकांना शक्यतो संध्याकाळी विहीरीच्या पाण्याने ओलीत करावे, कारण कालव्याच्या पाण्याच्या तापमानापेक्षा विहिरीच्या पाण्याचे तापमान काहीसे जास्त असते.त्यामुळे फळबागेमधील जमिनीचे तापमान वाढण्यास मदत होईल. थंडीपासून संरक्षणासाठी केळी बागेतील घडास २ ते ६ % सच्छीद्रतेचे पांढऱ्या प्लॅस्टिक बॅगचे आवरण करावे. यामुळे पिकांना थंडीपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल.थंडी परतल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून असणाऱ्या ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे. मात्र आता थंडी परतल्याने रब्बी पिके जसे की गहू, हरभरा कांदा आदि पिकांना याचा फायदा होणार आहे.

करडईवर मावा पडण्याची शक्यता

थंडीचा रब्बी पिकांवरील सकारात्मक व नकारात्मक परिणाम व उपाययोजना येणाऱ्या थंडीचा रब्बी पिकांवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम होणार आहे.त्याअनुषंगाने विचार केल्यास करडई पीक सध्या फुलोरा अवस्थेमध्ये आहे. या पिकावर येणाऱ्या थंडीचा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्याचबरोबर यावर पडणाऱ्या किडीवर शेतकऱ्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.थंडीमुळे करडईवर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय-योजना करणे आवश्यक आहे.सोलापुर जिल्ह्यात ज्वारीखालील क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. सध्या ज्वारीचे पीक फ्लोरा अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.किमान तापमानात होणारी घट या पिकासाठी उपयुक्त आहे.पिकाच्या पुढील वाढीसाठी हे वातावरण फायदेशीर ठरणार आहे.पण तापमान किमान अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास या पिकासाठी अनिष्ट परिणाम करणारे ठरणार आहे.दाणे भरण्यासाठी अडचण ठरणार आहे. गहू पीक सध्या मुकुट मुळी फुटण्याच्या अवस्थेत ते काडी धरण्याच्या अवस्थेत आहे.या पिकासाठी हे वातावरण फायदेशीर ठरणार आहे. या पिकावर मावा,कुडकूडे वाढण्याची शक्यता आहे.हरभरा पीक सध्या फ्लोरा अवस्था ते घाटे धरण्याच्या स्थितीत आहे.ही थंडी या पिकासाठी उपयुक्त ठरणार आहे. या हिवाळी ऋतूमध्ये अचानक ढगाळ तर कधी थंडी जाणवत आहे.हा हवामान बदलाचा परिणाम रब्बी पिकांवर जाणवत आहे.तो काही प्रमाणात सकारात्मक व नकारात्मक आहे.

लेखक – शरद केशवराव बोंडे
ता अचलपूर जिल्हा अमरावती

error: Content is protected !!