राज्यात काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस लावणार हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कडक उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर आता राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3, 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

कसे असेल राज्यातील हवामान ?
राज्यातील रत्नागिरी, हिंगोली ,नांदेड मुंबई आणि आसपासचा भाग याठिकाणी दाट ढगांची दाटी झाली असून पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या नागपूर शाखेने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 23 आणि 24 रोजी विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे तर दिनांक 25 आणि 26 रोजी बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ ,वर्धा, अमरावती या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

पुढील २४ तासात हवामान अंदाज
पुढील २४ तासांत, तामिळनाडू, केरळ, कर्नाटकचा काही भाग, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस पडू शकतो. 23 आणि 24 मार्च रोजी जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादच्या काही भागात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.

Leave a Comment

error: Content is protected !!