हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात, हूमणी अळीचा (Humani Ali Control) प्रादुर्भाव विविध पिकांवर आढळतो. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होते. या किडीच्या नियंत्रणासाठी पीक लागवड पूर्वी पासून एकात्मिक नियंत्रण उपाय करणे गरजेचे असते. कारण वेगवेगळ्या अवस्थेत या किडी पिकांना नुकसान पोहोचवितात. उभ्या पिकात प्रौढ हूमणी अळीचे नियंत्रण करण्यासाठी ‘प्रकाश सापळा’ (Light Trap For Humani) हा सर्वात चांगला उपाय (Humani Ali Control) असून अगदी कमी पैशात सहज करता येणारा आहे.
हूमणी अळीमुळे पिकांचे होणारे नुकसान (White Grub Damage)
खोड, मुळ्या फस्त करते हूमणी: हूमणी (White Grub) अळीपूर्वीची पतंग ही त्याची प्राथमिक अवस्था असते. खरीप हंगामात ज्यावेळी पाऊस पडत नाही आणि अवर्षणजन्य स्थिती निर्माण होते. त्यावेळी हूमणी अळीचे (Humani Ali Control) पतंग जमिनीत अंडी घालतात आणि त्या अंड्यातून निघालेली हूमणी अळी ही खोड व मुळे फस्त करते. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण शेतात वेगवेगळ्या जागी मोठ्या प्रमाणात झाडे वाळून जातात. विशेषत: ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ह्या किडीमुळे होणारे नुकसान जास्त आढळून येते
प्रकाश सापळ्यांचा वापर करून असे करा नियंत्रण (Humani Ali Control)
शेतकर्यांनी लिंबाच्या किंवा बाभळीच्या झाडाखाली संध्याकाळी शेतात प्रकाशासाठी बल्ब लावून त्याखाली पसरट भांड्यात पाणी ठेवून त्यावर ऑइल किंवा रॉकेलसारखे खनिज द्रव्याचा थर पसरावा. त्या प्रकाशामुळे पतंग बल्बकडे आकर्षित होऊन भांड्यातील पाण्यात पडून खनिज द्रव्यामुळे मरतात. या पद्धतीने हूमणी अळीचे नियंत्रण करता येते.
अलीकडच्या काळात प्रकाश आणि गंध सापळा (Pheromone Trap) यांना एकत्रित करून एक नवीन प्रकाश-फेरोमोन कॉम्बो कीटक सापळा (Light-Pheromone Combo Trap) विकसित करण्यात आलेला आहे. हा सापळा पर्यावरणास अनुकूल, असून हूमणी अळीचे नियंत्रण करण्यास कार्यक्षम आहे.