light trap : शेती करत असताना भाजीपाल्याचे फळपिकाचे तसेच फुलपिकांचे किडी मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहते. कधी कधी तर किडी संपूर्ण पीकच नष्ट करतात यामुळे शेतकरी देखील हतबल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहते. मात्र आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत. त्या उपायामुळे तुम्ही सहज किडीवर नियंत्रण करू शकता
किडीचे नियंत्रण करण्यासाठी प्रकाश सापळा ठरतोय वरदान (light trap)
शेतकऱ्यांना तुम्ही किडीने त्रस्त झाला असेल तर हा उपाय नक्की करा यामुळे तुम्हाला मोठा फायदा होई. शेतात कीड येण्याच्या कालावधीमध्ये जमिनीपासून चार ते पाच फूट उंचीवर एक बल्ब लावा त्याच्या अर्धा ते एक फूट खाली पाण्याचे भांडे ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही प्रकाश सापळा तयार करू शकता याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. रात्रीच्या वेळी बल्बच्या प्रकाशाकडे कीटकांचे आकर्षण होईल यावेळी सुरुवातीला कीटक बल्बच्या प्रकाशाने बल्बभोवती फिरतील त्यानंतर बल्बखाली ठेवलेल्या पाण्याला स्पर्श होताच त्यामध्ये बुडून मरतील. अशाप्रकारे किडींचे नियंत्रण मिळवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
शेतकरी मित्रांनो या जुगाडासोबतच तुम्हाला अजून शेती संबंधित काही जुगाडांची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा. यामध्ये शेतकऱ्यांनी शेतीमध्ये केलेले नवनवीन जुगाड आणि त्यांची माहिती तुम्हाला या ॲप मध्ये मिळेल. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला अशा जुगाडांची गरज असेल तर तुम्ही लगेचच प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप इंस्टाल करू शकता.
शेतकरी मित्रांनो हा प्रकाश सापळा बनवून झाल्यावरती तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सापळ्यातील बल्बचालू ठेवण्याची वेळ रात्री ७ ते १० वाजता बल्ब चालू ठेवा. त्यानंतर तो बल्ब बंद करा कारण रात्री उशिराने कीटक प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि पाण्यात बुडून मरतात त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. त्याचबरोबर बाजारामध्ये देखील विविध प्रकाश सापळे उपलब्ध आहेत. तसेच सोलर शक्तिवर चालणारे स्वयंचलित प्रकाश सापळे देखील बाजारात मिळतात त्यांचा उपयोग करून देखील तुम्ही कीड वर नियंत्रण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर घरगुती पद्धतीने सापळा बनवायचा प्रयत्न केला तर तो देखील तुम्ही बनवू शकता