Loksabha Election 2024 : कांद्याने केला करेक्ट कार्यक्रम; निवडणुकीत शेतकऱ्यांनी 7 जणांना दाखवला घरचा रस्ता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी (Loksabha Election 2024) विशेष प्रसिद्ध आहे. याच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत सर्वच जागांवर सत्ताधारी उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला. मात्र, आता राज्यातील अन्य चार लोकसभा मतदारसंघात देखील कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका सत्ताधारी भाजपला बसल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपवर राज्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष होता. त्याच्या प्रत्यय मतपेटीतून पाहायला मिळाला असून, कांदा उत्पादक पट्टयातील शेतकऱ्यांनी भाजपच्या विरोधात (Loksabha Election 2024) मतदान केल्याने, राज्यातील जवळपास सात उमेदवारांना घरचा रस्ता धरावा लागला आहे.

कांदा पट्ट्यातील पराभूत भाजप-महायुतीचे उमेदवार (Loksabha Election 2024)

  • भारती पवार (दिंडोरी) – पराभूत
  • हेमंत गोडसे (नाशिक) – पराभूत
  • हिना गावित (नंदुरबार) – पराभूत
  • सुजय विखे पाटील (अहमदनगर दक्षिण) – पराभूत
  • सुभाष भामरे (धुळे) – पराभूत
  • शिवाजीराव अढळराव पाटील (शिरुर) – पराभुत
  • सदाशिव लोखंडे (शिर्डी) – पराभुत

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासोबतच नाशिक लोकसभा मतादरसंघातही (Loksabha Election 2024) मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. या मतदारसंघात देखील महायुतीचे उमेदवार हेमत गोडसेंना पराभवाचा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गोडसे यांच्या विरोधात मतदान केले. याचा फटका त्यांना बसला आहे.

नंदुरबार धुळे अहमदनगर, शिर्डी, शिरूर मतदार संघातही फटका

नंदुरबार, धुळे, अहमदनगर या मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. यावेळी या शेतकऱ्यांनी देखील विद्यमान खासदारांना आस्मान दाखवलं आहे. नंदुरबारमध्ये हिना गावित यांचा पराभव झाला आहे. तर धुळ्यात डॉ. सुभाष भामरे यांचा तर अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महायुतीच्या विरोधात मतदान केले. .या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला आहे.

error: Content is protected !!