Loksabha Election 2024 : अखेर कांद्याने केला सत्ताधाऱ्यांचा वांदा; नाशिकचे दोन्ही उमेदवार पराभूत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल (Loksabha Election 2024) जाहीर होत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीपासून कांद्याचे घसरलेले दर आणि केंद्र सरकारचे आठमुठे धोरण याबाबत राज्य, राष्ट्रीय पातळीवर कांदा दर हा खूप महत्वाचा मुद्दा ठरला होता. कांद्याने अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. ज्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही सत्ताधारी खासदारांप्रती शेतकऱ्यांमध्ये (Loksabha Election 2024) नेहमीच रोष दिसून येत होता.

नाशिकमध्ये सत्ताधारी उमेदवारांच्या डोळ्यात पाणी (Loksabha Election 2024)

मात्र, आज नाशिक जिल्ह्यातील याच मतदारांनी गेल्या वेळच्या सत्ताधारी उमेदवारांच्या डोळ्यातून पाणी काढले आहे. जिल्ह्यातील मतदारांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election 2024) भास्कर भगरे यांना तर नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे या दोन्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरभरून मते देत मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.

मुळातच नाशिक जिल्हा हा कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. याशिवाय नाशिक जिल्ह्यातच नाही तर राज्यातील अनेक भागांमध्ये कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कांदा प्रश्न चांगलाच पेटला होता. मात्र, याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर अखेर लोकसभा निवडणुकांत शेतकऱ्यांनी आपला रोष मतांद्वारे देत चांगलाच डंका दिला आहे.

कांदा प्रश्न सोडवण्यात अपयश

सुरवातीला डिसेंबरमध्ये केलेली निर्यात बंदी, त्यानंतर शेतकऱ्यांचा झालेला आक्रोश… नंतरच्या काळात शेतकऱ्यांनी कांदा प्रश्न उचलून धरत आंदोलने, निवेदने सादर केली. मात्र नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून दोन्ही उमेदवार सत्ताधारी पक्षातील असताना देखील हा प्रश्न सुटू शकला नाही. आणि तिथेच त्यांचा आगामी निवडणुकीतील पराभव निश्चित झाला होता. त्यावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

कसा इंगा दाखवल्याची चर्चा

दरम्यान, केंद्रातील सरकारने कांदा निर्यातबंदी करुन ठरवून कांद्याचे भाव पाडले. हा रोष शेतकऱ्यांना होताच मात्र, त्या दुधाचे पडलेले दर, सोयाबीन, कापसाला मिळणारा कवडीमोल भाव, टोमॅटोसह अन्य शेतमालाची देखील हीच परिस्थिती होती. ज्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार बद्दल तीव्र संतापाची लाट होती. राज्यातही हीच परिस्थिती असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले होते. ज्यामुळे आता निकाल हाती आल्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी तसेच समाजमाध्यमांवर कांदा उत्पादकांनी ‘कसा इंगा दाखवला’ अशीच चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!