Maharashtra Agriculture Award: राज्यपाल यांच्या हस्ते 29 सप्टेंबरला होणार राज्यस्तरीय कृषी पुरस्काराचे वितरण!  

0
7
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यस्तरीय कृषी पुरस्काराचे (Maharashtra Agriculture Award) वितरण रविवार, दि. 29 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहेत. राज्यातील कृषी विभागातर्फे (Agriculture Department) देण्यात येणाऱ्य मागील तीन वर्षाच्या कृषी पुरस्काराचे वितरण (Award Distribution) याप्रसंगी होणार आहेत. कृषी पुरस्कारांच्या रकमेत तिप्पट वाढ केल्यानंतर होणारा हा पहिलाच कृषी पुरस्कार वितरण सोहळा आहे. कृषी पुरस्कारांची रक्कम याआधीच शेतकर्‍यांच्या (Farmers) खात्यावर जमा करण्यात आली असून मुंबईत प्रातिनिधिक स्वरूपात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C P Radhakrishnan) यांच्या हस्ते पुरस्कार (Maharashtra Agriculture Award) वितरण करण्यात येणार आहेत.

राज्यातील शेती, उद्यान आणि कृषिसंलग्न क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी (Agriculture Award) करणार्‍यांना दरवर्षी राज्य सरकार मार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (आदिवासी), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न आणि उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार असे 209 पुरस्कार (Maharashtra Agriculture Award) प्रतिवर्षी देण्यात येतात. गेल्या दोन वर्षांचे पुरस्कार जाहीर झाले. मात्र या पुरस्काराचे वितरण करण्यात आलेले नाही. याआधी कृषिरत्न पुरस्कारासाठी 75 हजार, कृषिभूषणसाठी प्रत्येकी 50 हजार, शेतीमित्र आणि युवा शेतकरी पुरस्कारासाठी प्रत्येकी 30 हजार, शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी प्रत्येकी 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येत होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या काळात झालेल्या कृषी पुरस्कार सोहळ्यात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी या पुरस्कारांची रक्कम तिप्पट करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार रक्कम खात्यावर जमा झालेली आहे.

राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्था यांना विविध पुरस्कार शासना मार्फत जाहीर झाले असून शेतकर्‍यांचा सपत्नीक राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार होता. मात्र मागील सहा महिन्यांनंतरही पुरस्कार वितरणाचा मुहूर्त लागत नव्हता. मात्र आता 29 सप्टेंबर रोजी कृषी पुरस्काराचे (Maharashtra Agriculture Award) वितरण होणार आहे.

कृषी पुरस्कार (Maharashtra Agriculture Award) सन 2020 व 2021 या वर्षातील बक्षि‍साची रक्कम वितरित करण्याबाबत शासन स्तरावरील शासन निर्णयानुसार सदर निधी बीडीएस प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. मात्र काही पुरस्कारार्थी यांच्या खात्यावर निम्मीच रक्कम जमा झाल्याचे समजते.