Subsidy For Goshala: मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील गोशाळांना अनुदान देण्याचा निर्णय; देशी गायींना मिळणार ‘राज्यमाता’ चा दर्जा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील गोशाळांमधील देशी गायींसाठी अनुदान (Subsidy For Goshala) देण्यात येणार आहे. देशी गायींच्या (Desi Cow) पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय (Maharashtra Cabinet) काल 30 सप्टेंबर 2024 ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देशी गायीला राज्यमातेचा (Rajya Mata)दर्जा देण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. हा निर्णय (Subsidy For Goshala) घेणारा महाराष्ट्र (Maharashtra) हा देशातील पहिला राज्य असणार आहे.

2019 मधील 20 व्या पशू गणनेनुसार (Animal Census) देशी गायींची संख्या 46 लाख 13 हजार 632 इतकी कमी असल्याचे आढळून आले आहे. ही संख्या 19 व्या पशूगणनेशी तुलना करता 20.69 टक्क्यांनी कमी झाली आहे.

गोशाळांना (Goshala) अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने, त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे हा निर्णय (Subsidy For Goshala) घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “देशी गायी हे आपल्या शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. त्यामुळे तिला ‘राज्यमाता’चा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासोबतच गोठ्यात देशी गायींचे संगोपन करण्यासाठी 50 रुपये प्रतिदिन अनुदान (Subsidy For Goshala) योजना राबविणार आहोत. कमी उत्पन्नामुळे गोशाळांना हा खर्च उचलता येत नव्हता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे”.

error: Content is protected !!