हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मार्च महिन्यांपासून ते सध्या सुरू असलेल्या एप्रिल महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस सुरूच पहायला मिळतो. या पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक आणि नैसर्गिक नुकसान झाले. यामुळे आता शेतकरी द्विद मनस्थितीत पहायला मिळत आहेत. या नुकसान भरपाईचा निधी सोमवारी (ता.१०) एप्रिल या दिवशी आदेश काढण्यात आला.
सरकारी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
या निधीच्या माध्यमातून २ लाख २५ हजार १४७ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. चार ते आठ आणि १६ ते १९ मार्च दरम्यान राज्यात नैसर्गिक संकट ओढवले होते. अजूनही गारपीट आणि पावसाचा कहर सुरू असल्याने चार ते पाच दिवस अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘अवेळी पाऊस’ ही नैसर्गिक आपत्ती घोषित केली होती. त्याआधारे संबंधित महसूल विभागाकडून किती भागात किती नुकसान झाले याची माहिती मागविण्यात आली होती. यात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती या भागांना नुकसान भरपाई मंजूर झाली.
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयेच निधी मराठवाडा विभागाला देण्यात आला आहे.
नाशिक विभाग – नाशिक विभागात ६३ कोटी ९ लाख ७७ हजार रुपये एवढा निधी देण्यात आला आहे.
अमरावती – अमरावती विभागाला २४ कोटी ६७ लाख ९५ हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पुणे – पुणे विभागाला पाच कोटी ३७ लाख ७० हजार निधी देण्यात आला.
२ लाख ७५ हजार १४७ शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत मुदत मिळणार असून घरपडझडीसाठी ३८ लाख, पशुधनाची भरपाई अडीच लाख तसेच बाधितापैकी एक लाख १३ हजार ४०२ हेक्टर क्षेत्राला मदत मंजूर झाली आहे.