हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात जुलै महिन्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस (Maharashtra Monsoon Update) झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिलेली आहे.
राज्यात कोकण विभागात 41 टक्के, मध्य महाराष्ट्रात 45 टक्के, मराठवाडा विभागात 27 टक्के आणि विदर्भात 36 टक्के सरासरी पेक्षा जास्त पाऊस (More Than Average Rainfall) झालेला आहे.
पावसाचा अंदाज (Maharashtra Monsoon Update)
संपूर्ण राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम (Heavy Rain) राहणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात आलेली आहे (Maharashtra Monsoon Update) .
पुढील 2 ते 3 दिवस कोकण विभागात (Konkan) मुसळधार ते अति मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक धरणे 90 टक्के भरले असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने (IMD Pune) केले आहे. तर पुण्यात देखील पुढील 2 ते 3 दिवस चांगला पाऊस बरसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. पुण्यात दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येत होते. मात्र आज पुन्हा एकदा सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पुणे शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट (Monsoon Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
मराठवाड्याला अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा (Maharashtra Monsoon Update)
राज्यात मध्य पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना मराठवाड्याला (Marathwada Monsoon) मात्र, अजून पावसाची प्रतिक्षाच आहे. मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने धरणे अजून कोरडीच असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपले आहेत. आकडेवारीनुसार मराठवाडा विभागात 59 टक्के पाऊस झाला आहे. मात्र नद्या आणि धरणे अजूनही कोरडीच असल्याचे चित्र आहे, त्यात ही परिस्थिती असताना पुढील 22 दिवस पावसाचा खंड राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तविल्याने मराठवाड्यात चिंतेची परिस्थिती आहे. सध्या जायकवाडी प्रकल्पात अवघा 7 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.