Maharashtra Rainfall: पुढील 24 तास महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचे सावट; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा!

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पुढील 24 तास महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार (Maharashtra Rainfall) ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे (Maharashtra Rainfall).  

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणातील (Konkan Monsoon) जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. 5 ऑगस्टपर्यंत कोकणातील किनारपट्टीवर (Konkan Coast) सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मुंबईत देखील आज पावसाची शक्यता आहे, मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाकडून मध्यम स्वरुपाच्या पावासाचा इशारा देण्यात आला असून, हवामान ढगाळ राहणार आहे (Maharashtra Rainfall).

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall Prediction) अंदाज वर्तवण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात देखील आज मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र विजाच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा असं दुहेरी मोठं संकट असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अतिवृष्टीची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे (Maharashtra Rainfall).

दरम्यान सध्या देशातील अनेक भागांमध्ये हवामानामध्ये मोठा बदल झाला आहे, अनेक भागांमध्ये काही तासांमध्ये अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याच्या घटना घडल्या आहेत.