यंदाच्या साखर निर्यातीत महाराष्ट्राचा १ नंबरचा वाटा : शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त रयत शिक्षण संस्था सातारा याठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले , यंदाच्या वर्षी साखर निर्यात झाली, त्यात एक नंबरचा वाटा महाराष्ट्राचा आहे. 40 हजार कोटीची साखर यावर्षी परदेशात निर्यात झाल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. कारखानदारी उभी राहिली. शेतकऱ्यांनी कष्ट केले. उत्तम प्रकारचा ऊस पिकवला. पण ही कारखानदारी चालवण्यासाठी आवश्यक असणारा शिक्षीत वर्ग गावोगावी उभं करण्याचं काम आण्णांनी (कर्मवीर भाऊराव पाटील) यांनी केलं. त्यामुळेच कारखानदारी उभी राहू शकल्याचे शरद पवार म्हणाले.

यावेळी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती दिली. मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपयांचा माल आपण निर्यात करु शकलो. त्यामुळे शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना आपण संपन्न करु शकलो असे शरद पवार यावेळी म्हणाले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शैक्षणिक दालन अण्णांनी उभे केलं. सर्वसामान्यांना शिक्षण हे सुत्र कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वीकारले होते असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

पवार यांच्या हस्ते राहिबाई पोपेरे यांचा सत्कार

बीजमाता राहिबाई पोपेरे यांचा शरद पवार यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचेही शरद पवार यांनी कौतुक केले. सेंद्रीय शेतीचा आदर्श जनमाणसात पोहोचवण्याचे काम मोठं काम त्यांनी केलं आहे. शिक्षणाची संधी न मिळालेली व्यक्ती शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे पवार म्हणाले. जर आज आण्णा असते तर त्यांनी शाबासकीची थाप राहिबाईंच्या पाठीवर दिली असती असेही पवार यावेळी म्हणाले.

ही माणसं नसल्यामुळे आज मी अस्वस्थ

यावेळी बोलताना शरद पवार यांनी दिवंगत एन डी पाटील, गणपतराव देशमुख आणि शंकरराव कोल्हे यांची आठवण काढली. हे माणसं आज आपल्यात नाहीत. त्यांनी मोठं काम केले असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. ही माणसं नसल्यामुळे आज मी अस्वस्थ असल्याचे पवार म्हणाले. या माणसांनी आपलं आयुष्य झाकून दिले. आण्णांसाठी पडेल ते काम या माणसांनी केल्याचे शरद पवार म्हणाले. एन डी पाटील हे आण्णांचे आवडते विद्यार्थी होते. त्यांनी संबंध आयुष्य रयत शिक्षण संस्थेसाठी दिल्याचे शरद पवार म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!