Maharastra Rain : राज्याच्या विविध भागात सध्या पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. यादरम्यान मराठवाड्याबाबत पाहिले तर मराठवाडा हा तसा दुष्काळीच भाग आहे. मात्र या ठिकाणी अद्यापही पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था कोलमडून गेली असून शेतकरी देखील संकटात सापडला आहे. त्यामुळे आता येथील गावकऱ्यांनी पावसासाठी थेट देवाला साकडे घातले असल्याचे पाहायला मिळाले आह. पावसासाठी कुठे नमाज अदा केली जाते, कुठे दुवा मागितली जाते तर कुठे घागर यात्रा काढून महादेवाला साकडं घातल जात आहे.
सध्या पावसाचे दिवस आहेत मात्र तरी देखील पावसाने दडी मारल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे उगवून आलेली पिके सुकायला लागली आहेत. पाणीटंचाईचे ढग घोंगायला लागले आहेत. त्यामुळे बळीराजा आता थेट देवाला पावसासाठी साकडं घालताना पाहायला मिळत आहे.
तुमच्या भागात कधी पाऊस पडणार?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या भागात कधी पाऊस पडणार याबाबतची माहिती घ्यायची असेल तर लगेचच प्लेस्टोरवर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. या अँपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावात, तुमच्या भागात किंवा तुमच्या जिल्ह्यात कधी पाऊस पडणार याबाबतची अचूक माहिती मिळवू शकता. त्यामुळे लगेचच हे ॲप इंस्टॉल करा. महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त हवामान अंदाज नाही तर तुम्ही या ॲपच्या माध्यमातून सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, रोजचे बाजार भाव, इत्यादी गोष्टींची माहिती अगदी सहजपणे आणि मोफत मिळू शकतात.
मराठवाड्याबरोबरच राज्यात पावसाआभावी पिकाबरोबरच पिण्याच्या पाण्याचे देखील मोठे संकट दिसू लागले आहे. यामुळे जालना येथील मुस्लिम बांधवांनी तर पावसासाठी थेट अल्लाकडे दुवा मागितली आहे. सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन चांगला पाऊस पडावा यासाठी ही प्रार्थना केली आहे. शहरांमधील कदिम जालना हदगाव मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत चांगला मुसळधार पाऊस पडावा यासाठी प्रार्थना केली आहे.
त्याचबरोबर औरंगाबाद मधील पैठणच्या पाचोड खुर्द येथील महाकालेश्वर महादेवाच्या मंदिरात नागरिकांनी आणि महिलांनी हंड्याने पाणी नेऊन जलाभिषेक घातला. महाकालेश्वर देवा पाऊस पडू दे , पिक पाणी जगू दे असे साकडे देखील यावेळी तेथील नागरिकांनी देवाकडे घातले आहे.