Maharastra Rain : चिंताजनक बातमी! महाराष्ट्रासह भारतामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती; हवामान विभागाने दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharastra Rain : महाराष्ट्रासह देशभरात पावसाने दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या संकटात आहेत. यावर्षीचा ऑगस्ट महिना देशांमधील 1901 सालापासूनचा सर्वात कोरडा महिना आहे. त्याचबरोबर यंदाचा मान्सून 2015 नंतरचा सर्वात कोरडा हंगाम असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिले आहे. अल निनोमुळे यावर्षी पाऊस घटला असून महाराष्ट्रासह देशावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत.

सध्या सप्टेंबर महिना चालू होईल तरीदेखील अजून राज्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांची खरीप पिके वाया जाण्याच्या स्थितीत आहेत अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिके चुकू लागली आहे तर काही ठिकाणी पीके करपली आहेत सध्या ईशान्य भारत वगळता संपूर्ण देशांमध्ये पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जून महिन्यात मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यानंतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, राजस्थान, या काही राज्यांमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस झाला.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात 254.9 मीमी पाऊस पडला आहे तर ऑगस्ट महिन्यात 32 टक्के कमी पाऊस पडला असून १९०१ सालपासूनचा हा सर्वाधिक कोरडा ऑगस्ट ठरला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये एकही दिवस म्हणावा असा पाऊस झाला नाही त्यामुळे 1901 सालापासूनचा हा सर्वात कोड ऑगस्ट ठरला आहे. पर्जन्यमानातील या तुटीसाठी हवामानातील घटक कारणीभूत असल्याचे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांची परिस्थिती भयंकर

सध्या राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती भयंकर असल्याचे दिसत आहे. पाण्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहेत. काही शेतकरी तांब्याने तर काही शेतकरी फळबाग जगवण्यासाठी टॅंकरने विकत पाणी घेऊन शेतीला देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभा राहिल आहे. त्यामुळे आता सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

error: Content is protected !!