Maharastra Rain : सध्या राज्यात पावसाने चांगलीच दडी मारली आहे त्यामुळे राज्यभर दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारकडे दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली होती. त्याचबरोबर आता पावसाने पाठ फिरवल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी असे शेतकरी म्हणत आहेत. (Nahik News)
नाशिकमध्ये पिकांना तांब्याने पाणी देण्याची वेळ
नाशिक जिल्ह्याला कृषी प्रधान जिल्हा म्हणून ओळखले जाते. निसर्गाचा वरदान लाभलेला परिसर म्हणून नाशिकची एक वेगळीच ओळख आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक गावं सध्या तहानलेली असून पावसाने पाठ फिरवल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील निमगाव मध्ये पाऊस न झाल्याने पिकांना तांब्या तांब्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. शांताराम गांगुर्डे आणि सुनीता गांगुर्डे या जोडप्याने झेंडू शेतीला तांब्याने पाणी दिल्याची माहिती समोर आली आहे
या जोडप्याने दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर 2000 झेंडूच्या रोपांची लागवड केली होती. मात्र पाऊसच नसल्याने गांगुर्डे दाम्पत्याला टँकरने पाणी मागून ते विहिरीत तसेच ड्रममध्ये भरावे लागते आणि त्यानंतर दिवसातून दोन वेळा तांब्याने पाणी दिले जाते. आजवर पहिल्यांदाच अशी वेळ आमच्यावर आली असल्याचे या शेतकरी दांपत्याने सांगितल आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करून मदत करावी असे देखील या दांपत्याचे म्हणणे आहे.
दरम्यान, निमगाव पासून पुढे दोन किलोमीटरवर उर्धुळी गाव आहे. या गावांमध्ये तर भीषण परिस्थिती निर्माण झाले आहे. जसा उन्हाळ्यामध्ये दुष्काळ पडतो तशीच परिस्थिती ऑगस्टच्या शेवटी या ठिकाणी निर्माण झाले आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी पैसे खर्च करून टँकर बोलवावे लागत आहेत. यामध्ये विशेष म्हणजे पाण्याची मागणी वाढल्याने टँकर साठी त्यांना चार-पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे येथील गावकरी सांगत आहेत.
पाऊस कधी पडणार?
तुम्हाला जर पावसाचा अचूक हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या गावांमध्ये कधी पाऊस पडणार? त्याचबरोबर जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती कशी असेल? या सर्वांबाबत अचूक आणि सविस्तरपणे माहिती मिळेल. ती ही अगदी मोफत त्यामुळे लगेच गुगल प्ले स्टोअर वर जा आणि आपले हॅलो कृषी हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.