Maharastra Rain । चिंताजनक बातमी! ‘या’ जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; टॅंकरने पाणीपुरवठा सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharastra Rain । सध्या राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकांना त्याच बरोबर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती तर अतिशय गंभीर आहे. या ठिकाणी पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे मोठा पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या काही भागातील नागरिकांना टॅंकरने पाणी घ्यावे लागत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्येही खूप कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात त्या ठिकाणच्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोर जावं लागणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची खरी पिके पावसाआभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही शेतकरी तांब्या तांब्याने आपल्या पिकाला पाणी देत आहेत. तर काही शेतकरी फळबाग जगवण्यासाठी टॅंकरने पाणी देत आहेत. मात्र टॅंकरने पाणी मिळणे देखील या ठिकाणी मुश्किल होत चालले आहे. सर्वच लोकांना टँकरची गरज भासत असल्याने टँकरचे पाणी मिळण्यासाठी देखील चार-पाच दिवसांची वाट पाहावी लागते. त्यानंतर टँकरचे पाणी उपलब्ध होत आहे त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत.

महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा विदर्भ तसेच पुण्याच्या देखील काही ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊन सावल्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी कडकऊन पडून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे धरणातील पाणीसाठा आटत आहे.

सरकारने मदत जाहीर करावी शेतकऱ्यांची मागणी

सध्या खरी पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तुमच्या गावात कधी पाऊस पडणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या गावात कधी पाऊस पडणार याबाबतची माहिती घ्यायची असेल तर लगेचच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल इंस्टाल करा. यामध्येमध्ये तुम्ही रोजचा हवामान अंदाज पाहू शकता त्याचबरोबर तुमच्या गावात, तुमच्या भागात कधी पाऊस पडणार? याची अचूक माहिती तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून मिळेल. सध्या २ लाख शेतकरी अँप चा फायदा घेत आहे तुम्ही देखील याचा फायदा घ्यावा.

error: Content is protected !!