Mahareshim Abhiyaan: ‘महारेशीम अभियान’अंतर्गत तुती लागवडीसाठी 801 एकरांवर नोंदणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘महारेशीम अभियान 2024’ (Mahareshim Abhiyaan) अंतर्गत रेशीम विभागाकडे 801 एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील 443 एकर व हिंगोली जिल्ह्यातील 358 एकर नोंदणीचा समावेश आहे. केवळ या दोन जिल्ह्यात रेशीम विभागाने तुती लागवड ( Mulberry Cultivation) नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

कृषी विभाग व ग्रामपंचायत विभागाकडे तुती लागवडीसाठी नोंदणी झाली नसल्यामुळे त्यांचे उद्दिष्ट कागदावरच आहे. दरम्यान, या जिल्ह्यात तुती रोपवाटिका तयार करण्याची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे येत्या जूनमध्ये नवीन तुती लागवड करण्यासाठी रोपे उपलब्ध होतील, असे रेशीम विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बदलत्या हवामान स्थितीत पारंपरिक शेती पिकाच्या उत्पन्नाची जोखीम कमी करून शाश्वत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे. रेशीम उद्योगाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती व तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे या दुहेरी उद्देशाने हे महारेशीम अभियान राबविले जाते. नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘महारेशीम अभियाना’मध्ये (Mahareshim Abhiyaan) परभणी जिल्ह्यात 1 हजार 100 एकर व हिंगोली जिल्ह्यात 750 एकर असे एकूण 1 हजार 850 एकर तुती लागवडीसाठी नोंदणीचे उद्दिष्ट होते.

परभणी जिल्ह्यात रेशीम विभागाला 350 एकर, कृषी विभागाला 400 एकर, जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत विभागाला 350 एकर असे एकूण 1 हजार 100 एकरांवर तुती लागवड नोंदणीचे उद्दिष्ट होते. परंतु केवळ रेशीम विभागाकडे 443 एकरांवर तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. कृषी व ग्रामपंचायत विभागाकडे नोंदणी झालेली नाही. परभणी जिल्ह्यात जुनी व नवीन मिळून 579 शेतकऱ्यांकडे 618 एकरांवर तुती लागवड आहे, असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी जी. आर. कदम यांनी सांगितले.

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील तालुका निहाय तुती लागवड नोंदणी स्थिती एकरांत

परभणी 39, जिंतूर 67, सेलू 9, मानवत 85, पाथरी 15, सोनपेठ 5, गंगाखेड 51, पालम 15, पूर्णा 157, हिंगोली 25, कळमनुरी 75, वसमत 100, औंढा नागनाथ 100, सेनगाव 58

हिंगोली जिल्ह्यात 400 एकर लागवड (Mahareshim Abhiyaan)

‘‘हिंगोली जिल्ह्यात रेशीम विभागाला 250 एकर, कृषी विभागाला 300 एकर, जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामपंचायत विभागाला 200 एकर असे एकूण 750 एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट होते. परंतु केवळ रेशीम विभागा अंतर्गत 358 एकरांवर तुती लागवडीसाठी नोंदणी झाली. जिल्ह्यात जुनी व नवीन मिळून सुमारे 400 एकर तुती लागवड आहे,’’ असे जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे यांनी सांगितले (Mahareshim Abhiyaan).

error: Content is protected !!