Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana: आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या गरीब लोकांवर उपचार (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) करणे यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government Scheme) ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची’ अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ हे कोणत्याही प्रकारचे रेशनकार्ड असणारे नागरिक घेऊ शकतात. तसेच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेले शेतकरी सुद्धा या योजनेत सामाविष्ट करण्यात आलेले आहेत. तसेच ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत आहे, अशा गरीब लोकांसाठी शस्त्रक्रिया प्रत्यारोपण थेरेपी सारख्या महागड्या आरोग्य सेवा सुद्धा या योजनेअंतर्गत (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) पुरवल्या जाणार आहेत. या सर्व आजारांसाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय रुग्णालय निवडली गेलेली आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील नोंदणीची पात्रता (Eligibility For Enrollment In The Scheme)

  • अर्जदाराचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे गरजेचे असणार आहे.
  • या योजनेतील (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) अर्जदार हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबाचे आणि त्यांचे उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असणारे सर्व राज्यातील नागरिक हे या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामधील गरीब कुटुंबातील कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड असलेल्या म्हणजेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असलेले शेतकरी लाभ घेऊ शकतात. लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.

जन आरोग्य योजनेची कार्यपद्धती

  • या योजनेचा (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) लाभ घेण्यासाठी शहरातील रहिवाशांना जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावे लागणार आहे.
  • त्यानंतर गावातील उमेदवारांसाठी त्यांना शासकीय आरोग्य शिबिरात जाऊन त्यांचा आजार तपासून घ्यावा लागेल.
  • यानंतर अर्जदारास त्याच्या आजाराची तपासणी ही तज्ञ डॉक्टरांकडून करून घ्यावी लागेल.
  • एकदा का आजाराची खात्री झाल्यास रोगाचा तपशील आणि खर्चाचा तपशील आरोग्य मित्रांना कळवून नोंदवला जाईल. तसेच आजाराचा त्रास रुग्णालय व डॉक्टरांचा खर्च या योजनेच्या पोर्टल वर ऑनलाइन दाखल केला जाईल.
  • ही प्रक्रिया चोवीस तासाच्या आत पूर्ण होईल यानंतर रुग्णालयावर उपचार सुरू केले जातात आणि उपचारा दरम्यान कोणताही उपचार संबंधित खर्च रुग्णाकडून केला जात नाही.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा तपशील (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana)

  • अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेल्या पिवळ्या अंत्योदय अन्नपूर्णा योजना व केशरी शिधा पत्रिका धारक ज्यांचे उत्पन्न हे एक लाख पर्यंत आहे तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी असणार आहेत.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति वर्ष दीड लाखापर्यंत चे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष अडीच लाखापर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबासाठी कोणत्याही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तीला वरील योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत विशेष सेवांतर्गत ७७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश असणार आहे.
  • या योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी विम्याचा हप्ता हा राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत नॅशनल इन्शुरन्स कंपनीमार्फत  करण्यात येतो.
  • या योजनेत शासकीय आणि निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची ३० पेक्षा अधिक खाटा असणारे असणाऱ्या निकषांवरून करण्यात आली आहे. लाभार्थी त्यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही रूग्णालयात त्यांचा उपचार करून घेऊ शकतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची फी किती ?

या योजनेअंतर्गत (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) लाभार्थी रुग्णास ही निशुल्क वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. ती पुर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधा पत्रक पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केसरी व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय राहणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना देखील लाभ देण्यात येणार आहे. १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये सातबारा उतारा फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीभूत रुग्णालयांमधून उपचार हा अनुज्ञेय राहणार आहे. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयाचा उपचार निदान आवश्यक औषधोपचार व भोजन तसेच एका वेळचा परतीचा प्रवास खर्च यामध्ये समावेश करून दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत रुग्णालयातून मुक्त केलेल्या केल्यानंतर दहा दिवसांत पर्यंतचा सेवा पॅकेज मध्ये समाविष्ट आहेत.

आरोग्यमित्र

अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णांची नोंदणी उपचारादरम्यान सहाय्यक तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्रांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र हे उपलब्ध असणार आहेत.

आरोग्य शिबिर

योजनेचा (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) लाभ अधिकाधिक रुग्णांना घेता यावा, यासाठी अंगीकृत रुग्णालयामार्फत ही आरोग्य शिबिरे

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड

  • रेशन कार्ड
  • सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या आजाराचे प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • अर्जदाराची तीन पासपोर्ट आकाराची फोटो

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेची अधिक माहिती आणि नोंदणीसाठी https://www.jeevandayee.gov.in/  या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्या.

error: Content is protected !!