Mahindra Tractor: महिंद्राने लॉन्च केला शेतकऱ्यांसाठी ‘हा’ किफायतशीर आणि प्रभावी ट्रॅक्टर; जाणून घ्या माहिती सविस्तर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर (Mahindra Tractor) उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने शेतकऱ्यांसाठी एक नवीन महिंद्रा 275 DI TU PP ट्रॅक्टर (Mahindra 275 DI TU PP Tractor) उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लॉन्च केला आहे. उच्च क्षमता आणि शक्तिशाली श्रेणीतील हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांची (Tractor For Farming) वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे कृषी कार्य अधिक कार्यक्षमतेचे करता येईल. उच्च कार्यक्षमता असलेल्या या ट्रॅक्टरला, देखभाल-दुरुस्ती मात्र कमी  प्रमाणात लागते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा ट्रॅक्टर (Mahindra Tractor) एक किफायतशीर आणि प्रभावी पर्याय आहे. आधुनिक वैशिष्ट्ये आणि दीर्घ सेवा क्षमता यामुळे हा ट्रॅक्टर शेतीसाठी आदर्श आहे. जाणून घेऊ या महिंद्रा 275 DI TU PP ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये.

महिंद्रा 275 DI TU PP ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये (Mahindra 275 DI TU PP Tractor Features)

  • महिंद्रा 275 DI TU PP ट्रॅक्टर (Mahindra Tractor) शक्तिशाली 3-सिलेंडर आणि mZIP इंजिनसह सुसज्ज आहे. जे 2760 cc च्या इंजिन क्षमतेसह येते. हे इंजिन जास्तीत जास्त 180 Nm टॉर्क आणि 25% बॅक-अप टॉर्क देते, ज्यामुळे ते कृषी कार्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
  • ट्रॅक्टरचे इंजिन कार्यक्षम असल्यामुळे शेतीची कठीण आणि जड कामेही सहजतेने पूर्ण करू शकतो. तसेच या ट्रॅक्टरची  याची वजन/भार उचलण्याची क्षमता 1500 किलो आहे.
  • या ट्रॅक्टरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याची इंधन कार्यक्षमता. कमी इंधन वापरामुळे (SFC) शेतकऱ्यांच्या ऑपरेटिंग खर्चात बचत होते. हा ट्रॅक्टर 400 तास दीर्घ काम करतो ज्यामुळे देखभाल वेळ आणि खर्च कमी होतो.
  • ट्रॅक्टरची PTO पॉवर 35.5 HP (26.5 kW) आहे, ज्यामुळे विविध कृषी अवजारे सहजपणे चालवली जातात. हा ट्रॅक्टर आंशिक जाळी (Partial Constant Mesh) प्रणालीने सुसज्ज आहे.   
  • या ट्रॅक्टरला 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गीअर्स आहेत, ज्यामुळे विविध शेतीची कामे सहजपणे पूर्ण करता येतात.
  • या ट्रॅक्टरला (Mahindra Tractor) फॅक्टरी-फिट बंपर आणि टो हुक देण्यात आले आहेत, ज्यामुळे आधुनिक शेतीच्या गरजांसाठी टिकाऊ, शक्तिशाली आणि विश्वासार्ह पर्याय आहे.

महिंद्रा 275 DI TU PP हे प्रगत तंत्रज्ञान, शक्तिशाली इंजिन आणि कमी देखभाल वैशिष्ट्यांसह शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय म्हणून उदयास येत आहे. हा ट्रॅक्टर (Mahindra Tractor) शेतकऱ्यांसाठी सर्व आघाड्यांवर उत्तम कामगिरी करणारा आणि त्यांची शेती अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर करणारा आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.