हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील प्रमुख ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा ट्रॅक्टर्सने (Mahindra Tractor Sale) मे 2024 या महिन्यातील आपले ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. कंपनीच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात कंपनीची कामगिरी चांगली झाली आहे. मे 2024 या महिन्यामध्ये देशांतर्गत विक्रीत 6 टक्के आणि निर्यात विक्रीत 85 टक्के वाढ झाली आहे. तर कंपनीच्या मे महिन्यातील एकूण ट्रॅक्टर विक्रीत 9 टक्के वाढ झाली आहे. असे महिंद्रा ट्रॅक्टर्स कंपनीने (Mahindra Tractor Sale) आपल्या अधिकृत आकडेवारीत म्हटले आहे.
देशांतर्गत विक्रीत 6 टक्के वाढ (Mahindra Tractor Sale In May 2024)
महिंद्रा कंपनीने जारी केलेल्या विक्री अहवालानुसार, महिंद्रा ट्रॅक्टर्सने मे 2024 मध्ये देशांतर्गत बाजारात एकूण 35,237 ट्रॅक्टरची विक्री (Mahindra Tractor Sale) केली आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने देशातंर्गत बाजारात 33,113 ट्रॅक्टरची विक्री केली होती. अर्थात महिंद्रा ट्रॅक्टर्सने मे 2024 मध्ये आपल्या देशांतर्गत विक्रीमध्ये 6 टक्के वाढ साधली आहे.
तर कंपनीने मे 2024 या महिन्यामध्ये भारताबाहेर 1872 ट्रॅक्टर विकले आहेत. तर गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनी केवळ 1013 ट्रॅक्टरची निर्यात करण्यात यशस्वी ठरली होती. अर्थात मे 2024 या महिन्यामध्ये कंपनीच्या ट्रॅक्टर निर्यात विक्रीत 85 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.
दरम्यान, कंपनीच्या आकडेवारीनुसार मे 2024 या महिन्यातील देशांतर्गत आणि निर्यात विक्री मिळून एकूण ट्रॅक्टर विक्रीत देखील 9 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने मे 2024 या महिन्यामध्ये एकूण 37,109 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. तर मागील वर्षी याच महिन्यात कंपनीला एकूण 34,126 ट्रॅक्टरची विक्री करण्यात यश मिळाले होते.
ट्रॅक्टरची मागणी वाढण्याची शक्यता
महिंद्रा अँड महिंद्राचे फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले की, “कंपनीने मे 2024 मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत 35,237 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वेकडील राज्ये नैऋत्य मान्सूनचे वेळेवर आगमन आणि पेक्षा जास्त मान्सूनचा अंदाज यामुळे खरीप पिकांसाठी जमिनीची तयारी करण्याची क्रिया वेळेवर सुरू होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे येत्या काही महिन्यांत ट्रॅक्टरची मागणी वाढेल निर्यात बाजार, अमेरिकेला ओजा ट्रॅक्टर निर्यातीच्या आधारावर, कंपनीने 1,872 ट्रॅक्टर विकले आहेत. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 85 टक्क्यांनी वाढले आहे.”