हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीमध्ये एका दणगट ट्रॅक्टरची (Mahindra Tractors) आवश्यकता असते. ज्यामुळे शेतकरी नेहमी विविध कंपनीच्या ट्रॅक्टरची माहिती मिळवताना दिसून येतात. मात्र, या सर्वांमध्ये देशभरातील शेतकरी महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरला सर्वाधिक जास्त पसंती देतात. हे अनेकदा शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर वापरातून अनुभवातून समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण महिंद्रा कंपनीच्या ‘महिंद्रा 575 डीआय एसपी प्लस’ या ट्रॅक्टरबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. महिंद्राचे ट्रॅक्टर (Mahindra Tractors) भारतातच नव्हे तर विविध देशांमध्ये देखील विशेष लोकप्रिय आहे.
‘महिंद्रा 575 डीआय एक्सपी प्लस’ ट्रॅक्टरबद्दल (Mahindra Tractors For Farmers)
महिंद्रा 575 डीआय एक्सपी प्लस हा 47 एचपीचा ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरची इंजिन क्षमता 3054 सीसी असून, या ट्रॅक्टरला कंपनीने चार सिलेंडर दिलेले आहेत. जे आरपीएम दोन हजार 100 रेटेड इंजिन उत्पन्न करते. जे ट्रॅक्टर खरेदीदारांसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय हे अत्याधुनिक ट्रॅक्टर मॉडेलला पुढील बाजूस आठ तर मागील बाजूस दोन रिव्हर्स गिअरसोबत एक मजबूत गेअर बॉक्स देण्यात आला आहे. महिंद्रा 575 डीआय एक्सपी प्लस या ट्रॅक्टरची पीटीओ पॉवर ही 42 एचपी इतकी आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कठीण कामे करण्यासाठी या ट्रॅक्टरचे शक्तिशाली इंजिन मदतगार ठरते.
काय आहेत वैशिष्ट्ये?
- महिंद्रा ट्रॅक्टर ब्रँड आपल्या उन्नत आणि आधुनिक वैशिष्ट्यांमुळे भारतीय शेतकऱ्यांमध्ये खुप प्रसिद्ध आहे.
- महिंद्रा 575 डी आय एक्सपी प्लस ट्रॅक्टरमध्ये (Mahindra Tractors) सिंगल क्लच आहे. जो शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे काम करण्यात मदत करतो.
- या ट्रॅक्टरच्या स्टेरिंग चा प्रकार पॉवर स्टेरिंग असून, ज्यामुळे ट्रॅक्टरला नियंत्रित करणे एकदम सोपे जाते. तसेच जलदरित्या काम करणे सोपे होते.
- या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता अर्थात हायड्रोलिक उचलण्याची क्षमता 1500 किलोग्रॅम असून, या ट्रॅक्टरला 65 लिटरची डिझेल टाकी देण्यात आली आहे.
- या ट्रॅक्टरचा मायलेज एकदम मजबूत असून, कमीत कमी इंधनात जास्तीचे काम करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा जास्तीचा खर्च वाचतो.
- या ट्रॅक्टरमध्ये टूल्स, हुक, टॉप लिंक, कॅनोपी, बंपर सारखे ॲक्सेसरीज देखील उपलब्ध आहेत.
- हा ट्रॅक्टर सहा वर्षाच्या वारंटी सह उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास मजबूत होतो.
- हा ट्रॅक्टर कल्टीवेटर, रोटावेटर, नांगरणी व इतर उपकरणांसाठी खूप उपयोगी मानले जाते.
- सध्यस्थितीत बाजारामध्ये कमी किमतीत एकापेक्षा एक ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. परंतु जबरदस्त फीचर्स असणारे महिंद्रा 575 एक्सपी प्लस या स्पर्धेमध्ये देखील टिकून आहे व या ट्रॅक्टरला जास्त मागणी आहे.
किती आहे किंमत?
महिंद्रा 575 एक्सपी प्लस एक बहुद्देशीय ट्रॅक्टर असून, शेतीच्या सर्व कामांसाठी एकदम मदतगार आहे. या ट्रॅक्टरची किंमत सहा लाख ते सहा लाख 45 हजार रुपये असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक बजेटनुसार उपयुक्त अशी किंमत आहे. या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत स्वस्त असून, राज्यानुसार ती बदलत राहते.