Maize Market: मका बियाणे दर गगनाला, तर मक्याचे बाजारभाव रसातळाला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या मका बाजारात (Maize Market) एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. मक्याचे बियाणे (Maize Seed Price) 600 रुपये किलोने विक्री होत आहे, तर शेतकर्‍यांचा मका 12 रुपये किलो दराने विकला जात आहे.

सध्या पेरणीचा हंगाम (Kharif Sowing) सुरू आहे, तर अनेक शेतकरी गेल्या हंगामातील साठवून ठेवलेला माल विक्रीला काढत आहेत (Maize Market). त्यात मका 12 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे, तर मक्याचे बियाणे 600 रुपये प्रति किलो दराने शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहेत. या तफावतीमुळे शेतकरी (Farmer) संतप्त झाले आहेत.

सध्या मका बियाण्याची साडेतीन किलोची बॅग आहे. या पॅकवर 2100 रुपये एमआरपी आहे. हाच मका शेतकरी पिकवतो, तेंव्हा हंगामाच्या सुरुवातीला फक्त 12 ते 13 रुपये किलो या दराने विकावा लागतो आहे. जो सधन शेतकरी आहे तो राखून ठेवतो. 18-20 रुपये किलो भाव मिळाल्यावर विकतो. त्यामुळे या बियाण्यांच्या भाव वाढीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली जात आहे. संकरित वाण तयार करताना कंपनीला खर्च येतो. मात्र, तरीही एवढी तफावत कशी, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. यासाठी सरकारने उत्पादन खर्चावर आधारित भाव शेती मालासाठी निश्चित केले पाहिजेत, अशी मागणी होत आहे (Maize Market). 

सरकारने लक्ष घालावे

संकरित बियाण्यांची किंमत (Hybrid Maize Seed Price) कंपन्याचं ठरवतात, सरकारने यावर नियंत्रण आणले पाहिजे. विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या विषयावर चर्चा घडवून आणली पाहिजे अशी मागणी होत आहे.

काय आहे आजचा मका बाजारभाव (Maka Bajarbhav)  
आजच्या बाजारभाव (Maize Market) अहवालानुसार सर्वसाधारण बार्शी बाजारात सरासरी 2300 रुपये तर करमाळा बाजारात 2451 रूपयांचा दर मिळाला. तर लाल मक्याला अमरावती बाजारात 2062 रुपये, पुणे बाजारात 2750 रुपये तर अमळनेर बाजारात 2425 रूपयांचा दर मिळाला. तर लोकल मक्याला मुंबई बाजारात 3350 रुपये तर तासगाव बाजारात 2250 रुपये दर मिळाला. तसेच पिवळ्या मक्याला धुळे बाजारात (Maize Market) 2465 रुपये, भोकरदन पिंपळगाव रेणू बाजारात  समितीत 2150 रुपये तर देवळा बाजार 2415 रूपयांचा दर मिळाला.

error: Content is protected !!