Maize Seeds For Hydroponics: मक्याच्या दाण्यांपासून ‘या’ पद्धतीने बारा दिवसात करा चारा निर्मिती!

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जिल्ह्यात यंदा जून महिन्यात अपेक्षित पाऊस (Maize Seeds For Hydroponics) झाला नाही. आता पाऊस होत असला तरीही पावसाची तूट आहे. हिरवा चारा (Green Fodder) उपलब्ध होत असल्याने चाऱ्याचा प्रश्न काहीसा मिटला आहे. परंतु पावसाळ्यात दुभत्या जनावरांना (Dairy Animals) हिरवा चारा चरण्यासाठी बाहेर नेता येत नाही.

आज आम्ही तुम्हाला हायड्रोपोनिक’ (Maize Seeds For Hydroponics) पद्धतीने कमी पाणी, कमी जागा व कमी वेळेत सकस चारा निर्मिती कशी करायची याबद्दल माहिती देणार आहोत. हिरव्या चाऱ्याला पर्याय म्हणून ग्रामीण भागातील काही पशुपालक (Dairy Farmers) या मक्याचे दाणे भिजवून हायड्रोपोनिक पद्धतीने चारा निर्मिती करण्यास प्राधान्य देत आहेत. चारा टंचाईवर (Fodder Shortage) मात करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांकडून हायड्रोपोनिक पद्धतीने चारा निर्मितीचे तंत्र (Maize Seeds For Hydroponics) अवलंबिले जाते. जाणून घेऊ या पद्धतीबद्दल सविस्तर माहिती. 

कशी करायची चारा निर्मिती?

काही ठिकाणी तयार केलेल्या चारा पद्धतीनुसार, मक्याच्या दाण्यांना 24 तास भिजत ठेवा. 24 तासानंतर हे दाणे गोणपाटात काढून घेतल्यानंतर त्याला मोड येतात. यानंतर मोड आलेले मक्याचे दाणे घरात सात ते आठ मातीच्या मोठ्या टोपल्या आणि प्लास्टिक ट्रे यात माती टाकून पेरून ठेवा. एका ठिकाणी 400 ग्रॅम मका पेरून त्याला दररोज दर दोन तासाने पाणी द्यावे, यातून एका आठवड्यात हा चारा वाढून पुढे 12 दिवसांत त्याची संपूर्ण वाढ होईल. एका ट्रेमध्ये साधारण सहा किलोपेक्षा अधिक चारा (Maize Seeds For Hydroponics) उपलब्ध होईल.

वेळ, पाणी अन् जागेचीही बचत

या चाऱ्यामध्ये पौष्टिक प्रथिने (Nutrients In Hydroponics), कर्बोदके, चवदार जीवनसत्त्व, सूक्ष्म अन्न घटकांचे प्रमाण भरपूर आहे. कमी पाणी लागत असल्यामुळे हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरत आहे. यामुळे कमी जागेत कमी खर्चात सगळ्या प्रकारच्या हवामानात वर्षभर चारा उत्पादन करणे शक्य आहे.

भरडलेल्या धान्यापेक्षा पौष्टिक

दुभत्या जनावरांना चारा म्हणून भरडलेले धान्य मोठ्या प्रमाणात दिले जाते. मात्र, पशुपालकांनी शोधलेल्या हायड्रोफोनिक चारानिर्मिती (Maize Seeds For Hydroponics) तंत्राच्या माध्यमातून केली जाते. हा चारा भरडलेल्या धान्यापेक्षा सुद्धा पौष्टिक आहे.

शंभर टक्के सेंद्रिय, शेळ्यांनाही उपयोगी

चारा तयार करण्यासाठी कोणतेही रासायनिक खत किंवा औषध वापरले जात नसल्याने हा चारा 100 टक्के सेंद्रिय आहे (Organic Fodder). हा चारा शेळ्या (Goat Fodder) आवडीने खात असून, यामुळे शेळीचे आरोग्य चांगले राहते.