अशा पद्धतीने करा मिर्ची लागवड भाग -1 ; भरघोस उत्पन्न देतील हे वाण 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मसाले पिकांमध्ये प्रमुख स्थान असलेल्या मिरचीची लागवड भारतातील दक्षिण भागात मोठ्या प्रमाणावर करण्यात येते . महाराष्ट्रातही मिरचीची लागवड करण्यात येते .आज हॅलो कृषी मिरची भाग -1 मध्ये जाणून घेऊ मिरची लागवड ते वाण निवडीची माहीती.मिरची पिकातून दर्जेदार उत्पादनासाठी हा लेख आपल्याला नक्की आवडेल .

हवामान

उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते. पावसाळात जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास फूलांची गळ जास्त होते. पाने व फळे कुजतात. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगला आहे . मिरचीच्या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस तापमानाला चांगली होते. आणि उत्पादनही भरपूर येते. तापमानातील तफावतीमुळे फळे फुले गळ मोठ्या प्रमाणात होते. व उत्पन्नात घट येते. बियांची उगवण 18 ते 27 सेल्सिअस तापमानास चांगली होते.

जमीन

पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या ते मध्यम भारी जमिनीत मिरचीचे पिक चांगले येते. हलक्या जमिनीत योग्यय प्रमाणात सेंद्रीय खते वापरल्यास मिरचीचे पिक चांगले येते पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत मिरचीचे पिक घेऊ नये ( जसे कि चोपण जमिन ). पावसाळ्यात तसेच बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्हागळयात मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.

हंगाम 

खरीप पिकाची लागवड जून, जूलै महिन्यात आणि उन्हाळी पिकाची लागवड जानेवारी फेब्रूवारी महिन्यात करावी.

वाण 

1) पुसा ज्वाला

ही जात हिरव्या मिरचीसाठी चांगली असून या जातीची झाडे बुटकी व भरपूर फांद्या असलेली असतात. फळे साधारणपणे 10 ते 12 सेमी लांब असून फळांवर आडव्या सुरकुत्या असतात. फळ वजनदार व खुप तिखट असते. पिकलेली फळे लाल रंगाची असतात.

2) पंत सी- १ 

हिरव्या व लाल (वाळलेल्या ) मिरचीच्या उत्पादनाला ही जात चांगली आहे. या जातीची फळे उलटी असतात. मिरची पिकल्यावर फळांचा आकर्षक लाल रंग येतो. फळे 8 ते 10 सेमी लांब असून साल जाड असते. फळांतील बियांचे प्रमाण अधिक प्रमाणात असून बोकड्या रोगास प्रतिकारक आहे.

3) संकेश्वरी 32 

या जातीची झाडे उंच असतात. मिरची 20 ते 25 सेमी लांब असून पातळ सालीची असतात. सालीवर सुरकुत्या असतात. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असतो.

4) जी – 2, जी – 3, जी – 4, जी – 5 

या जातीची झाडे बुटकी असतात. या मिरचीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या चांगल्या जाती आहेत. फळाची लांबी 5 ते 8 सेमी असून फळांना रंग गर्द तांबडा असतो.

5) मुसाळवाडी 
या जातीची झाडे उंच वाढतात. खरीप हंगामासाठी ही जात चांगली असून बोकड्या, भूरी आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.

 

6) पुसा सदाबहार 

या जातीची झाडे उंच असून पाने इतर जातीपेक्षा रूंद असतात. पिकलेली मिरची तेजस्वी लाल रंगाची असते. या जाती हिरव्या मिरचीचे सरासरी उत्पादन साडेसात ते दहा टन व वाळलेल्या मिरचीचे दीड ते दोन टन उत्पादन मिळते. ही जात मावा कोळी या किडींना तसेच डायबॅक आाणि विषाणूंजन्य रोगांना प्रतिकारक आहे.

बियाण्यांचे प्रमाण 

हेक्टरी 1 ते दीड किलो बियाणे वापरावे.

Leave a Comment

error: Content is protected !!