Business Idea : नारळापासून बनवा Icecream, Jelly; बक्कळ पैसे कमावण्यासाठी असा करा प्रक्रिया उद्योग..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे बहुतांशी शेतकरी हे पारंपरिक पिके आणि शेती (Coconut) करून उदरनिर्वाह करतात. पण शेतीपूरक व्यवसाय कडे वळण्याचा शेतकऱ्यांचा कल कमीच असतो. शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्यागात लक्ष घातले तर ते नक्कीच चांगला नफा कमावू शकतात. आज आपण हॅलो कृषी च्या माध्यमातून एका फायदेशीर आणि अनोख्या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. Business Idea

आपल्याकडे शेतकरी म्हणावा त्याप्रमाणे प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष देत नाही. केवळ कच्चा माल पुरवण्याचं काम शेतकरी करतो. मात्र सध्या शेतकर्‍यांनी स्वत: व्यवसायात उतरण्याची गरज आहे. शेतीला व्यवसायील दृष्टिकोनातून पाहिलं तर नक्कीच बक्कळ पैसा कमवता येऊ शकतो. थायलंड येथे नारळापासून अनेक उत्पादने घेतली जातात. यामध्ये Icecream, Jelly हे सुद्धा बनवलं जातं. आम्ही जोडलेला व्हिडिओमध्ये तुम्ही कशाप्रकारे नारळापासून विविध पदार्थ बनवलेले जातात हे पाहू शकता.

खरंतर नारळाला आपल्याकडे कल्पवृक्ष असे म्हंटले जाते. नारळाची शेती अनेक वर्षांपासून केली जाते. पण केवळ शहाळी आणी तयार नारळ विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? नारळापासून नारळपाणी, हेल्थी ड्रिंक्स, जेली आणि महत्वाचे म्हणजे आईस्क्रीम तयार करता येते.

थायलंड सारख्या देशामध्ये नारळापासून (Coconut) असे विविध पदार्थ बनवून विकले जातात. विशेषतः तेथील नारळापासून बनवलेले आईस्क्रीम अधिक पसंत केले जाते. त्याच धर्तीवर भारतामध्ये देखील तुम्ही नारळाची शेती करीत असाल तर अशा पद्धतीने पदार्थ बनवून स्वात:चा ब्रँड तयार करून नफा मिळवू शकता.

या व्यवसायातील आव्हाने

१)हा व्यवसाय करण्यासाठी नारळाची शेती करावी लागेल लागवड केल्यानंतर नारळ किंवा शहाळी तयार होण्यासाठी बराच वेळ लागतो.
२)हा व्यवसाय करण्यासाठी मशीनरी आवश्यक आहेत.
३)बाजारपेठ उपलब्ध होणे गरजेचे
४) हा व्यवसाय करण्यासाठी मशीन आणि मनुष्य या दोहोंची आवश्यकता असते.

या व्यवसायातील जमेची बाजू

१) तुम्ही केवळ नारळाचे (Coconut) पाणी आकर्षक आणि टिकाऊ पॅकेजसह एनर्जी ड्रिंक म्हणून विकू शकता.
२)तुम्ही ओले खोबरे आणि पाणी दोन्ही उत्तम पॅकेजिंग सह विकू शकता.
३) नारळाची जेली तुम्ही नारळाच्या कवट्यांमध्येच तयार करून विकू शकता जेणेकरून अधिकच्या पॅकेजिंग चा खर्च येणार नाही. ते दिसताना देखील अधिक आकर्षक दिसेल.
४) कोकोनट आईसक्रीम बनवून विकू शकता.
५) हे सर्व पदार्थ बनवत असताना जो जैविक कचरा निर्माण होतो त्याचा पुनर्वापर ( खत,शोभेच्या वस्तू ,जळण ) करता येतो.

error: Content is protected !!