पपईपासून टुटीफ्रुटी बनवा आणि सुरु करा स्वात:चा व्यवसाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पपई हे फळ आपल्याकडे बाराही महिने उपलब्ध होते. परंतु पपई मार्केटमध्ये विक्रीस नेताना अनेकदा ते खराब होण्याची भीती असते. आहे स्थितीत पपईवर प्रक्रिया करून त्याच्यापासून पदार्थ बनवून तुम्ही विक्री करू शकता. हे प्रक्रियायुक्‍त पदार्थ वर्षभर टिकून राहतात. पपईपासून जॅम, जेली, मार्मालेड, टुटीफ्रुटी, पेपेन असे पदार्थ बनवून ये निर्यातदेखील करता येतात.

चवीला गोड शरीराला पोषक आणि त्‍वचेचे आरोग्‍य सुधारणारे फळ म्‍हणजे पपई. पपई शरीराला गरम असल्‍याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे. पपईमध्‍ये जीवनसत्त्व सी आणि तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्‍याने रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये कोलेस्‍टेरॉल साचून राहत नाही व प्रमाण कमी होते. एका मध्‍यम आकाराच्‍या पपईमध्‍ये १२० कॅलरीज असतात. पपईतील डायटरी फायबर मुळे वेळी अवेळी लागणा-या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.पचनक्रिया चांगली राहते आणि पचनशक्‍ती वाढवण्‍यास मदत होते. शरीरातील प्रथिनांच्‍या पचनासाठी पपईतील पेप्‍सीन हा घटक मदत करतो.

जीवनसत्त्व ए आणि सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्‍य चांगले राहते. अॅन्‍टी ऑक्‍सिडन्‍ट शरीरातील फ्री रॅडीकल्‍स आणि आतड्यांच्‍या कर्करोगांपासून दूर ठेवते. अॅन्‍टी ऑक्‍सिडन्‍ट, बीटा कॅरोटीन आणि जीवनसत्त्व इ व सी मुळे चेह-यावर चमक येते; तसेच सुरकुत्‍या कमी होतात. त्‍यामुळे पपईचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांमध्‍ये केला जातो.

पपईपासून टुटीफ्रुटी कसे बनवाल ?

  • १ किलो कच्या पपईच्‍या गराचे चौकोनी टुकडे कापून घ्‍यावेत.
  • अर्धा लिटर पाण्‍यामध्‍ये ४ टी स्‍पून चुना मिसळून त्‍यामध्‍ये पपईचे तुकडे अर्धा तास ठेवावे.
  • तुकडे दुस-या पाण्‍यात २ ते ३ वेळा धुवून पांढ-या मलमलच्‍या कापडात बांधून ३ ते ५ मिनिटे वाफवून घ्‍यावे. त्यानंतर थोडावेळ थंड पाण्‍यात ठेवावे.
  • एक किलो साखरेचा एकतारी पाक करून गाळून घ्‍यावा व त्‍यामध्‍ये हे तुकडे पूर्ण एक दिवस ठेवावे.
  • तुकडे वेगळे करून पाक दोनतारी होईपर्यंत उकळावा व उकळताना त्‍यामध्‍ये सायट्रिक अॅसिड मिसळावे.
  • पाक गाळून घेऊन थोडा थंड झाल्‍यावर त्‍यामध्‍ये तुकडे व आवडीनुसार रंग घालुन मिसळावे व हे मिश्रण २ ते ३ दिवस ठेवावे.
  • तुकड्यांमध्‍ये पाक चांगला शिरल्‍यावर ते तुकडे बाहेर काढून वाळवावेत. तयार झालेली टुटीफ्रुटी बरणीत भरुन ठेवावी.
error: Content is protected !!