हॅलो कृषी ऑनलाईन: सप्टेंबर महिन्यात (Management Of Kharif Crops) सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. लवकर आणि वेळेवर पेरणी केलेली कापणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांचे नुकसान (Crop Damage) होण्याची शक्यता आहे. राज्यातील वेगवगळ्या भागात विविध पिकांची कशी काळजी घ्यावी याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन (Agriculture Advisory) केले आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी या सल्ल्याचा अवलंब करावा.
आपत्कालीन खरीप पीक व्यवस्थापन (Management Of Kharif Crops)
- खरीप पिके, भाजीपाला आणि फळबागातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्याची व्यवस्था करावी.
- काढणीस आलेल्या मूग आणि उडीद पिकाची लवकरात लवकर काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
- भुईमुग पिकात रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास फ्लूबेनडयामाइड 3.5% + हेक्साकोनाझोल 5% डब्ल्यूजी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- भात पीक: भात खाचरात बांध बंधिस्ती करून पाण्याची पातळी 5 -10 सें. मी. पर्यंत नियंत्रित करावी. तपकिरी आणि हिरवे तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच फिप्रोनील 5 एस.सी. @ 20 मिली. प्रति 10 लिटर पाण्यातून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी (Management Of Kharif Crops).
- कापूस: पावसाची उघडीप बघून कापूस पिकात आंतरमशागतीची कामे करावीत. कापसाचे पीक ८० दिवसाचे झाल्यानंतर मुख्य फांदीचा शेंडा खुडावा यामुळे पिकात कायिक वाढ मर्यादित होते.
- हळद पीक: पिकामध्ये गरजेनुसार बेणणी करून करून नत्र खताची दुसरी मात्रा 850 ग्रॅम युरिया प्रति गुंठा लागवडीनंतर तीन महिन्यांनी पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी. कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघड बघून फवारणी करावी. जमिनीत वापसा असताना पिकात आंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे (Management Of Kharif Crops).
- तूर: पीक 45 दिवसाचे झाल्यानंतर शेंडे 5 सेंमी वरून खुडावेत. खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 5% निंबोळी अर्क किंवा डायमेथोएट 30% प्रवाही 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- सोयाबीन पीक: सोयाबीन पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एकरी 10 ते 15 पिवळे चिकट सापळे लावावेत. पिवळा मोझॅक रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली किंवा थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेड सी 50 मिली प्रति एकर यापैकी एका किटकनाशकाची कोणत्याही प्रकारचे तणनाशक न मिसळता पावसाची उघड बघून फवारणी करावी. करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी. किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 140 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक फवारावे (Management Of Kharif Crops).
- खरीप ज्वारी: पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
- ऊस पीक: अतिरिक्त पाणी साचणे, कमी तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमूळे पिकात पोक्का बोइंग रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघड बघून 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. खोड किडीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20% 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी (Management Of Kharif Crops).
- लिंबूवर्गीय पिके: मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी. बागेत फळगळ दिसून येत असल्यास एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी (Management Of Kharif Crops).
- डाळिंब: बागेतील अतिरिक्त फुटवे काढून टाकावेत. किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी. बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
- चिकू: बागेत जमिनीत वापसा असताना आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
- आंबा: पूर्ण वाढलेल्या हापूस आंब्याच्या दरवर्षी फळे धरण्यासाठी पॅक्लोब्यूट्राझोलची आळवणी पावसाची तीव्रता कमी असताना करावी (Management Of Kharif Crops).