Maral Fish : मरळ माशाला बाजारात आहे मोठी मागणी; याचे पालन करून कमावू शकताय बक्कळ पैसे; जाणून घ्या कस करायचं नियोजन?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maral Fish : आपल्याकडे अनेकजण सध्या मत्स्य व्यवसाय करताना दिसत आहेत. मत्स्य व्यवसायामध्ये कमी खर्च आणि अधिक नफा मिळतो. त्यामुळे अनेक लोक हा व्यवसाय करत असल्याचे दिसत आहेत. या व्यवसायामध्ये गुंतवणूक फार कमी प्रमाणात असते. त्यामुळे अनेकांचा कल या व्यवसायाकडे वळत चाललेला आहे. यामध्ये जर चांगले व्यवस्थापन केले तर यामधून चांगले उत्पादन मिळू शकते. मत्स्यव्यवसाय करताना काही माशांच्या अशा प्रजाती आहेत ज्यामधून तुम्हाला चांगले भरघोस उत्पन्न मिळू शकता. यामधीलच एक प्रजात म्हणजे मरळ मासा.

तुम्ही जर मत्स्यव्यवसा करायचा विचार करत असाल तर तुम्ही मरळ माशाचे योग्य व्यवस्थापन करून त्यामधून चांगला नफा कमवू शकता. खासियत म्हणजे मरळ मासा आठ महिन्यांचा काळ पूर्ण केल्यानंतर 800 ते 900 ग्रॅम वजनाने वाढतो. हा मासा अनेक लोक आवडीने खातात याचं कारण असं की, या माशांमध्ये काट्यांची संख्या कमी असते आणि हा मासा चवीला चांगला असतो त्यामुळे अनेक जण हा मासा खाण्यास प्राधान्य देतात.

व्यवसाय सुरू कसा करावा?

तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कारण कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर योग्य नियोजन असेल तर त्यातून नफा देखील चांगला राहतो. तसेच या व्यवसायाचे देखील आहे. त्यामुळे या माशाच्या प्रजननक्षम पालन करता ६ बाय ५ बाय १ मीटर आकाराचे तळे वापरले जाते. या तळ्यातील पाण्याची पातळी एक मीटर एवढी ठेवावी. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रजननासाठी एका मादी सोबत दोन नर मासे ठेवले जातात.

शेती संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल तर लगेच करा ‘हे’ आहे काम

शेतकरी मित्रांनो तुम्ही शेती संबंधित एखादा व्यवसाय करायचा विचार करत असाल तर तुम्हाला आधी आमच्या अँप बद्दल माहिती घेणे गरजेचे आहे. त्याचं कारण असं की आमच्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाची मोफत जाहिरात करू शकता त्यामुळे लगेच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. जवळपास दोन लाख शेतकरी हे ॲप वापरत आहेत तुम्ही देखील याचा फायदा घ्यावा.

मरळ मासा हा उथळ पाण्यात आढळतो. हा मासा हवेतील प्राणवायू श्‍वसनासाठी वापरतो. त्याचबरोबर हा मासा पाण्याबाहेर काही तास ते काही दिवस जिवंत राहू शकतो. कमी पाण्यात देखील हा मासा जास्त काळ टिकून राहतो. या माशाचे वर्णन केले असता या माशाच्या डोक्याचा आकार हा साधारणपणे सापाच्या डोक्यासारखा असतो.

error: Content is protected !!