सिनेसृष्टीला निरोप देऊन ‘या’ अभिनेत्रीने कोकणात फुलवली शेती; शेतीसह कृषिपर्यटनाचीही सुरवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । कोरोनाच्या संकटामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय बुडाले पण या सगळ्यात शेती आणि शेतकरी मात्र टिकला आणि त्याने लोकांना टिकवलेही. शेतीचे महत्व जाणून घेऊन लोक शेतीकडे वळत आहेत. यामध्ये कलाकारांचासुद्धा समावेश होतो. या कलाकारांमध्ये मराठीतील अभिनेत्री संपदा कुलकर्णीने यांचेही नाव जोडले गेले आहे. त्यांनी आपली अभिनयसृष्टीची वाट बदलत शेती करण्यात स्वतःला झोकून दिलं आहे. कोकणात उत्तम प्रतीची शेती त्या पती राहुल कुलकर्णीसोबत करत आहेत. आतापर्यंत आपण त्यांना सिनेमाच्या पडद्यावर एक उत्तम अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निवेदिकाच्या भूमिकेत पाहिलं आहे. मात्र एका अन्नदात्या शेतकऱ्याच्या रूपात पाहणे नवीन आणि कौतुकाचे ठरत आहे.

सिनेमाच्या मुख्य टप्यावर शेतीकडे वाळलेल्या संपदा यांनी कोकणातील त्यांच्या ‘फुणगूस’ या गावी आपल्या पतीसह शेती करायला सुरवात केली आहे. इच्छा तिथे मार्ग’ या म्हणीनुसार त्यांनी आपली इच्छा आता मूर्त स्वरूपात अमलात आणली आहे. दाम्पत्याला शेतीचा थोडाही गंध नव्हता. शेतीविषयक पुस्तके, गुगल, तज्ञ मंडळी यांच्या सहाय्याने शेतीचं रीतसर ज्ञान त्यांनी मिळवले. आणि त्यानंतर शेतीत झोकून दिलं.

आंबा, काजू यांसारख्या फळांसोबत या दोघांनी आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने पारंपरिक पिक घेण्यास सुरुवात केली. यांनि पिकवलेला भाजीपाला आणि फळे थेट मुंबईमध्ये सुद्धा विक्रीसाठी जातात. कोकणातील पर्यटनाला या दोघांनी विशेष बढावा दिला आहे. ‘आनंदाचे शेत’ या नावाने पर्यटन संकल्पना सुरु केली आहे. पारंपरिक पद्तीने बैलगाडीतून फेरफटका मारून ते शेतीबद्दल माहिती देऊन आणि शेतात हुरडा पार्टी वैगरे करतात.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Leave a Comment

error: Content is protected !!