हॅलो कृषी ऑनलाईन: सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना (Crop Insurance) काढली असली तरी पीक विमा भरणाऱ्या शेतकर्यांमध्ये मराठवाडा विभागात (Marathwada Farmers) यावर्षी मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. सरकारने दिलेल्या 31 जुलैपर्यंतच्या मुदतीत 77.40 लाख शेतकऱ्यांनी 49.67 लाख हेक्टर क्षेत्राचा पीक विमा (Crop Insurance) काढला आहे. मागील वर्षी शेतकर्यांची संख्या 80.44 लाख होती. म्हणजे जवळपास शेतकऱ्यांच्या संख्येत 3 लाखांची घट झाली आहे.
पीक विमा (Crop Insurance) मिळण्यास येणार्या अडचणींमुळे यंदा शेतकऱ्यांनी योजनेची नोंदणीच न केल्याचं दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी 3.44 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नसल्याचे समोर आले आहे.
मराठवाड्यात मागील काही वर्षांत कधी दुष्काळ तर कधीकधी अतिवृष्टी यामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही, अशी अवस्था होती. तर दुसरीकडे पीक विमा भरल्यानंतरही केवळ नुकसानाची माहिती दिली नसल्याचे कारण पुढे करीत विमा कंपन्यांकडून (Crop Insurance Company) पीक विमा नाकारला जात होता. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा वगळता इतर 6 जिल्ह्यांमधून सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
शासनाने 1 रूपयामध्ये पीक विमा (Crop Insurance) जाहीर केला. त्यानुसार मागील वर्षी मराठवाड्यातील 80.84 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मात्र अनेक ठिकाणी 21 दिवसांचा पावसाचा खंड या निकषावर बोट ठेवत विमा कंपनीने शेतकर्यांना (Farmers) पीक विमा दिला नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली त्या ठिकाणी केवळ 2 ते 5 हजार रूपयांचाच विमा मंजूर केला आहे.
जिल्हा निहाय पीक विमा काढणारे शेतकरी
- संभाजीनगर- 11,40,876
- बीड – 17,17,176
- जालना – 9,13,977
- धाराशिव – 7,19,100
- हिंगोली – 4,78,330
- लातूर – 8,87,133
- नांदेड – 11,20,854
- परभणी – 7,63143
वरील संख्येनुसार आतापर्यंत 1 कोटी 56 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, मागील वर्षी 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला होता. यावर्षी मात्र, यामध्ये घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी आतापर्यंत 1 कोटी 56 लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत (PM Kharif Pik Vima Yojana) मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा 1 रूपयामध्ये पीक विमा (Crop Insurance) उतरवण्याची संधी शेतकर्यांना देण्यात आली होती.
पीक विम्याकडे पाठ फिरवण्याची कारणे
मागील वर्षी पिकविम्यामध्ये अनेक गैरप्रकार उघडकीस आले होते. एका शेतकऱ्यांच्या जमिनीवर परस्पर दुसर्याने विमा काढणे, शासकिय जमिनीवर विमा काढणे, अकृषक क्षेत्रावरील पिकांचा विमा काढणे, मंदिर तसेच अन्य धार्मिक स्थळांवरील जमिनीवरील पिकांचा विमा काढणे, सार्वजनिक संस्थांच्या जमिनीवरील पिकांचा विमा काढणे, जास्त क्षेत्राचा विमा काढणे, सामायिक क्षेत्रावर परस्पर विमा उतरवणे, एकाच बँक खात्यावर अनेक शेतकर्यांचा विमा काढणे असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे यावर्षी पीक विमा योजनेतील शेतकर्यांची संख्या घटल्याचे दिसत आहे. यावर्षी या योजनेते 10 लाख शेतकरी कमी होण्याची शक्यता आहे.