Marigold Flower Cultivation : फुलशेतीमध्ये शेतकऱ्यांना कमी वेळात चांगला नफा मिळू शकतो, परंतु आपल्या देशातील शेतकरी बांधव फुलांची फारच कमी शेती करतात. बघितले तर देशातील मोजक्याच राज्यांतील शेतकरी हंगामानुसार त्यांच्या शेतात फुलशेती करतात. शेतकऱ्यांना फुलशेतीकडे प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदतही केली जाते. बिहार सरकार राज्यातील झेंडूच्या फुलांच्या लागवडीसाठी शेतकरी बांधवांना चांगले अनुदान देत आहे. चलातर मग जाणून घेऊया यबद्दल माहिती.
मिळालेल्या माहितीनुसार, झेंडूच्या फुलांना राज्यातच नव्हे तर देश-विदेशातही मोठी मागणी असून या फुलांच्या किमतीही बाजारपेठेत खूप आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न सहज होऊ शकते. (Marigold Flower Cultivation )
फुलशेतीसाठी मिळणार अनुदान
फूल हे नगदी पिकांपैकी एक असून, शेतकऱ्यांनी त्याच्या पिकावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे, असे सरकारचे मत आहे. जेणेकरून राज्याच्या अर्थव्यवस्थेबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारू शकेल. यासाठी शासन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फुलशेतीसाठी अनुदान देत आहे. सध्या झेंडूच्या फुलांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून सुमारे ७० टक्के अनुदान मिळत आहे.
झेंडूच्या फुलाची लागवड करण्यासाठी मिळतील 28 हजार रुपये
बिहारमधील शेतकऱ्यांनी आपल्या एक हेक्टर शेतात झेंडूच्या फुलांची लागवड केल्यास त्यांना र28 हजार रुपयांपर्यंतची सुविधा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील झेंडूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने हेक्टरी युनिट खर्च ४० हजार रुपये निश्चित केला आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना ७० टक्के अनुदान दिले जाणार आहे. बिहारमधील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळत असले तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्यासाठी देखील महाराष्ट्र सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला गुगल प्लेस्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाल करावे लागेल. या अँपच्या माध्यमातून तुम्ही सर्व सरकारी योजनांची माहिती घेऊ शकता.
योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
जर तुम्हाला फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत झेंडूच्या फुलाच्या लागवडीवर उपलब्ध असलेल्या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला उद्यान विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही horticulture.bihar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.