हॅलो कृषी ऑनलाईन: स्तनदाह (Mastitis Detection Kit) हा पशुपालनातील (Animal Husbandry) सर्वाधिक आर्थिक हानी करणारा आजार आहे. स्तनदाह या आजाराला ग्रामीण भाषेत ‘दगडी’ आणि इंग्रजीमध्ये ‘मस्टायटीस’ (Mastitis Disease) या नावाने ओळखले जाते. दुभत्या जनावरांना होणार्या या आजारामुळे पशुपालकांना (Dairy Farmers) खूप नुकसान सहन करावे लागते. परंतु या आजारावर एक आनंदाची बातमी आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर (IITK) यांनी आधुनिक संशोधन केलेले एक नवीन किट (Mastitis Detection Kit) विकसित केली आहे. ‘लॅटरल फ्लो इम्युनोसे स्ट्रिप अँड मेथड फॉर डिटेक्शन ऑफ मॅस्टिटिस इन बोवाइन्स’ या नावाच्या संशोधित किट द्वारे आता अवघ्या काही मिनिटात स्तनदाहचे निदान करता येणे शक्य होणार आहे.
या किटचे संशोधन रसायन अभियांत्रिकी विभाग, IIT कानपूर आणि राष्ट्रीय केंद्राचे प्रा. सिद्धार्थ पांडा आणि डॉ. सत्येंद्र कुमार, वरिष्ठ प्रकल्प शास्त्रज्ञ, SCDT, IIT कानपूर (IITK) यांनी केले आहे. या तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट कार्यालयाने भारतीय पेटंट क्रमांक 455232 ने मंजूर दिली असून पॉलीक्लोनल अँटीबॉडी आणि स्ट्रिप चाचणीच्या रूपात नवीन डिझाइन वापरून ही किट (Mastitis Detection Kit) तयार करण्यात आली आहे.
दुभत्या जनावरांमध्ये (Dairy Cattles) स्तनदाह शोधण्यात क्रांती घडवून आणण्याचे या अभिनव तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट आहे. त्याचा व्यापक वापर सुलभ करण्यासाठी डेअरी उत्पादक कंपनीसोबत (Dairy Business) तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करार देखील पूर्ण केला गेला आहे.
स्तनदाह (मस्टायटीस) हे डेअरी उद्योगांमध्ये आर्थिक नुकसानीचे (Economical Loss) एक प्रमुख कारण मानले जाते, ज्यामुळे दुधाचे उत्पादन (Milk Production) कमी होते. तसेच दुधाची गुणवत्ता (Milk Quality) देखील खराब होते. या रोगामध्ये स्तन ग्रंथी व कासेच्या ऊतीमध्ये एक दाहक क्रिया घडते जी शारीरिक आघात किंवा सूक्ष्मजीव संसर्गामुळे होते. ज्यामुळे पशुपालकाची मोठी आर्थिक होत असते. अशावेळी ही संशोधित किट वापरून अवघ्या काही वेळात स्तनदाहचे निदान (Mastitis Detection Kit) करणे सोपे होणार आहे.
किटद्वारे अशी होते तपासणी
या किटमध्ये (Mastitis Detection Kit) दुधाचे काही थेंब टाकल्यावर अवघ्या काही क्षणात मस्टायटीसचे निदान होते. हाताळणीस सोप्या असलेल्या या किटद्वारे पशुपालक देखील सहजरित्या मस्टायटीसचे निदान करू शकतात.