फळ बाग असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तरुणाने बनवलं भन्नाट जुगाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आणि राज्यात शेती उपयोगी अनेक यंत्रे भारतातील युवक विकसित करत आहेत. यामुळे याचा खर्च, वेळ, शारीरिक मेहनत वाचते. पिकांची कापणी, लागवड यासाठी शेतकरी इतरही जुगाडू यंत्रांचा वापर करत होते. परंतु आता मालेगाव जिल्हा. नाशिक येथील मयूर निकम नावाच्या युवकाने पेरूचा गाभा वेगळा करण्यासाठी एक यंत्र विकसित केलं आहे.

मयूर निकम या युवकाने कृषी शाखेतून अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञानातून पदवी मिळवली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ‘एमटेक’चे शिक्षण घेतलं. एमटेकचे शिक्षण घेत असताना एमटेकच्या शेवटच्या आणि दुसऱ्या वर्षात प्रकल्प करावा लागतो. यासाठी मयुरने पेरू या फळाचा गाभा यंत्राच्या माध्यमातून काढता यावा. यासाठी पेरुवर प्रक्रिया करणारे यंत्र विकसित करण्यात आलं आहे. परंतु या यंत्रांची किंमत ही लाखाच्या घरात असल्याने स्वस्तात मस्त असे यंत्र मयूरने विकसित केलं. जेणेकरून ते सामान्य शेतकऱ्यांना देखील परवडले जाईल.

हायटेक शेती करून असा कमवा दुप्पट नफा

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती या अँपवर आहे. यासोबत तुम्हाला इलेक्ट्रिक बैल प्रमाणे इतर कोणतीही शेती उपयोगी उपकरणे अतिशय कमी किंमतीत विकत घ्यायचे असतील तर Hello Krushi अँप मोबाईल वर इंस्टॉल करून तुम्ही थेट Manufacturer कडून ते विकत घेऊ शकता. तसेच कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती यावर दिली जाते. तसेच सातबारा, जमिनीचा नकाशा सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतो. रोजचा बाजारभाव इथे समजतो. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही या अँपच्या माध्यमातून करता येते.

हे विकसित यंत्र, यंत्राची डिझाईन, पेरूच्या विविध जाती, प्रक्रिया पदार्थ टिकवण्याच्या पद्धती, या विविध बाजूंनी अभ्यास केला. यासह मयूरला शिक्षण घेत असताना काही शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. अथक प्रयत्नातून यश मिळवत मयूरने पेरुतील गाभा वेगळा करणारे यंत्र तयार करण्यास मयुरला यश मिळाले.

  • या यंत्राचे महत्त्वाचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती :
  • पेरूसारख्या फळासाठी हे यंत्र अधिक उपयूक्त आहे. पाच किलो प्रतीतास या यंत्राची क्षमता आहे.
  • फक्त छोट्या बियांसाठी या यंत्रांचा वापर करता येतो.
  • यंत्र हव्या त्या जागी स्थलांतरित करता येते. ठेवता येते, शिवाय भाग वेगळे करता येऊन जोडता देखील येतात.
  • यंत्राची कार्यक्षमता ही ९०.३३ टक्के आढळली. एक टन पेरुसाठी ८० तास लागतात.
  • तसेच यंत्राच्या मुख्य भागाकडे फूड ग्रेस एस एल स्टील’चा वापर केला. यामुळे गाभा आणि रसाची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. हे या यंत्राचे उद्दिष्ट पहायला मिळते.

पेटंट मिळवण्यात यशस्वी :

या यंत्रांचे गुणधर्म आणि वैशिष्ट पाहता त्यासाठी भारत सरकारकडे २०१८ या सालात अर्ज करण्यात आला. त्याची सर्व प्रक्रिया सोयीस्कर असून पेटंट मंजूर करण्यात आले. तसेच त्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पुढील २० वर्षात संरक्षण मिळेल का? कमी दरात ही यंत्रे शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहचवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी हे पेटंट मिळवण्यात यश मिळाले.

error: Content is protected !!