हळद प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या पद्धती, काय करावे आणि काय करू नये ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो यापूर्वीच्या लेखात आपण हळद शिजवण्याच्या पारंपरिक आणि आधुनिक पद्धती त्यांचे फायदे आणि तोट्यांची माहिती घेतली. आजच्या लेखात आपण हळद वळविण्याच्या पद्धती, हळद पॉलिश करण्याच्या पद्धती गुणवत्तापूर्ण हळद कशी असते याची माहिती घेऊया…

हळद वाळविणे

  • उच्च प्रतीची व टिकावऊपणासाठी शिजवलेली हलद एकसारखी वाळविणे.
  • वाळविण्याची क्रिया फरशीवर किंवा सिमेंट काँँक्रीटवर करावी.
  • साधारण 5 ते 6 से.मी.
    जाडीचा थर पसरून ठेवावा.
  • यापेक्षा कमी जाडीचा थर असल्यास कुरकुमीनचे प्रमाण कमी होते.
  • तसेच हळकुंडाचे काम करून वाळवल्यासही उष्णतेमुळे कुरकुमिन हे रंगद्रव्य उडून जाते व हळदीस फिक्कट रंग येतो.
  • हळ्द एकसारखी वाळावी म्हणून अधून मधून गड्ड्यांची उलथापालथ करावी.
  • उन्हात हळद वाळविल्यास (हळकुंडातील आर्द्रता 5 %) सुमारे 10 ते 15 दिवस लागतात.
  • ताज्या गाड्ड्याच्या वजनाच्या सुमारे 20 % वाळलेली हळकुंडे मिळतात.

हळद वाळवीण्याची विद्युत पद्धत

विद्युत वाळवणी यंत्रात हळद वाळवीण्यास 5 ते 6 दिवस लागतात. टनेल ड्रायर (पॉलिहाउस) मध्ये वाळवीण्यास 5 ते 6 दिवस लागतील. हळद शेडनेट (50 % सावली) मध्ये वाळविणे जेणे करून हळदीतील कुरकुमिन रंगद्रव्याचे प्रमाण टिकून राहते.

5) हळद पॉलिश करणे

  • हळद वाळवुन चांगली टणक झाल्यानंतर पॉलिश करावी.
  • पॉलिश केल्यामुळे कठीण काळपट (सुरकुत्या/ खवले) निघून जातात व हळद स्वच्छ होऊन पिवळी, चमकदार व गुळगुळीत बनते.
  • पॉलिश केल्यावर चांगला बाजारभाव मिळतो.

पॉलिश करण्याच्या विविध पद्धती

अ) हाताने चालविण्याचे यंत्र:
लाकडी ड्रम.

ब) स्वयंचलित यंत्र:

दोन माणसे दोन तासात 50 ते 60 किलो हलद पॉलिश करतात. यासाठी 2 Hp ची सिंगल फेज मोटार लागते.

6) हळदिला रंग देणे/ पावडर कोटिंग करणे (CFTRI पद्धत):

हळकुंडाचा रंग एकजीव एकसारख्या प्रमाणात पिवळी दिसण्यासाठी पॉलिशिंग करतांना हळदीचे मिश्रण लावावे.

1 क्विंटल हळदीच्या पॉलिशिंगसाठी खालील द्रावणाची शिफारस केली आहे.

  • तुरटी- ४० ग्रॅम
  • हळद पावडर- २ किलो
  • एरंडीचे तेल- १४० ग्रॅम
  • खाण्याचा सोडा- ३० ग्रॅम

पॉलिशिंगमुळे हळकुंडाला चकाकी व उजळ धमक पिवळा रंग येतो. पॉलिश केल्यावर 15 ते 25 % हळकुंडे मिळतात.

  • पॉलिश केलेली हळकुंडे दुहेरी पोत्यात भरून गोदामात साठवतात.
  • हळकुंडे ज्यूटची पोती, लाकाडीपेट्या किंवा जाळीदार कार्डबोर्डच्या पेट्यात साठवतात.
  • पॉलिश न केलेली खडबडीत हळकुंडे दोन ते तीन पेवात साठविता येतात.

7) हळकुंडाची गुणवत्ता मानके

  • हळकुंडाचीप्रत हि रंग (कुरकुमिनचे प्रमाण), आर्कषकपणा व आकार यावर ठरते.
  • हळकुंडाचा रंग गर्द पिवळा असावा व कडूपणा कमी असावा.
  • हळकुंड 2 ते 8 से.मी. लांब व 1 ते 2 से.मी. जाड हे गुणधर्म महत्वाचे असतात.
  • हळकुंडला मध्यभागी तोडले असता तुटलेला भाग सपाट, नारंगी लाल असावा.
  • हळकुंडाचा पृष्टभाग मेणचट व शिन्गासारखा दिसावा.
  • हळकुंडाचा वास कस्तुरी व काळ्या मिरीसारखा व स्वाद किंचित कडू असावा.
  • ओलिओरेझिन/ भूकाटीसाठी हळकुंडाचे लहान तुकडेही चालतात.

AGMARK मानके (हळकुंडासाठी):

  • आर्द्रता-9%
  • तुकडे-2%
  • टाकाऊ पदार्थ-1%
  • गोल गाढे-2%
  • इतर कचरा-1%
  • बुरशी-2 %

हळद प्रक्रियेपूर्वी लक्षात ठेवायचे मुद्दे

  • हळद काढणीनंतर जास्तीत जास्त दोन दिवसात शिजवून घ्यावी.
    रोगट हळद प्रकियासाठी घेवू नये. शेणाने सावरलेल्या पृष्टभागावर हळद वाळू घालू नये.
  • हळदीच्या चांगल्या रंगासाठी हळदीच्या पावडराशिवाय कोणतेही रसायन वापरू नये.
  • अर्धी ओली आणि वाळलेली हळकुंडे एकत्र मिसळू नयेत.
  • खराब पोत्यामध्ये किंवा जागेवर हळद साठवून ठेवू नये.
  • कुरकुमिनचे जास्त प्रमाण असलेल्या जातीची निवड करावी.
  • पिक पक्व होण्यापूर्वी काढणी करू नये.
  • काढणी करताना गड्ड्याना इजा होवू देवू नये.
  • शिजवण्यासाठी समप्रमाणात उष्णता द्यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!