Millet : भरडधान्य लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी `या´ राज्यात शेतकऱ्यांना 8 लाख 80 हजार `सीडकीट´चे मोफत वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : भरडधान्य लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राजस्थानच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना 2024-25 या आर्थिक वर्षी शेतकऱ्यांना बाजरीचे (Millet) ७ लाख ९० हजार तर ज्वारीचे ८९ हजार बीज मिनिकिटचे (Seed Minikit) चे मोफत वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे या राज्यात भरडधान्याच्या उत्पादनात वाढ होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

कमी पाण्यावर येणारी पिके– (Millet)

ज्वारी, बाजरी ही कमी पाण्यावर येणारी भरडधान्य पिके आहेत. बाजरीला सुपरफुडचाही दर्जा देण्यात आला आहे. बाजरी, ज्वारी, नाचणी तृणधान्ये तर राळा, वरई, कोद्रा, सावा राजगिरा ही लघुधान्य आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष `आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष´ म्हणून साजरे केले होते.

आहारातील तृणधान्याचे महत्त्व

ज्वारी : रक्तातील सारखेची पातळी नियंत्रित करते. रक्ताभिसरण वाढवते. ज्वारी वजन कमी करण्यास मदत करते. हाडांच्या आरोग्यासाठी ज्वारी उपयुक्त ठरते. शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते. तसेच ह्रदयाचे आरोग्यही ज्वारीमुळे सुधारते.

बाजरी : बाजरीमध्ये कॅल्शियम, विटामिन A, B व फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित, रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व ॲनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे.

नाचणी : शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ॲनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात. नाचणीमुळे लठ्ठपणा कमी करणे, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते.

error: Content is protected !!