Mini Tractors : ‘हे’ 3 मिनी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी आहेत किफायतशीर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये?

Mini Tractors For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीमध्ये मिनी ट्रॅक्टरचे (Mini Tractors) महत्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेही बैलांच्या माध्यमातून शेती करताना बैलांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्या तुलनेत कमी इंधनात मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती करणे सोईस्कर असल्याने, अनेक शेतकरी सध्या मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती करण्यावर भर देत आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील तुमच्या शेतीसाठी एखादा मिनी ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल. तर आज आपण युवराज-215 एनएक्सटी, महिंद्रा जीओ 245 डीआय आणि स्वराज्य 717 या तीन छोट्या ट्रॅक्टरबद्दल (Mini Tractors) सविस्तर जाणून घेणार आहोत.

‘हे’ आहेत किफायतशीर मिनी ट्रॅक्टर्स (Mini Tractors For Farmers)

युवराज-215 एनएक्सटी : हा भारतातील पहिला 15 पॉवर युनिट ट्रॅक्टर आहे. महिंद्रा मिनी ट्रॅक्टर (Mini Tractors) 15 एचपी सिंगल सिलेंडर कुल व्हर्टिकल इंजिनसह उपलब्ध आहे. जो 863.5 सीसी पॉवर जनरेट करतो. याव्यतिरिक्त तो शेतीच्या कामासाठी कॉम्पॅक्ट प्रचलित प्रदान करते. त्याचे एकंदरीत सुंदर डिझाईन केलेले असून, महिंद्रा युवराज 215 एनएक्सटी मिनी ट्रॅक्टर विशेषकरून बटाटा, कांदा, कापूस, ऊस, आंबा आणि संत्री यासारखे फळे आणि भाजीपाला लागवडीसाठी तयार करण्यात आले आहे. त्याची किंमत दोन लाख 50 हजार ते दोन लाख 75 हजारापर्यंत आहे.

महिंद्रा जीओ 245 डीआय : हा ट्रॅक्टर सर्व प्रकारची शेतीविषयक कामे सहजतेने करण्यास सक्षम असून, यामध्ये 86 एनएमच्या पिक टॉर्कसह अतुलनीय शक्ती आहे. याची मजबुत मेटल बॉडी खडबडीत भूप्रदेशात वापरण्यासाठी उत्कृष्ट कार्य प्रदर्शन करते. त्यासोबतच त्याची उच्च वजन वाहून नेण्याची क्षमता 750 किलो आहे. तसेच विविध अवजारे चांगली खेचण्याची क्षमता त्याच्यामध्ये असून, तो 4 व्हील ड्राईव्हसह उपलब्ध आहे. तसेच तो त्याच्या वर्गातील मायलेज आणि कमी देखभालीसाठी सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर म्हणून ओळखला जातो. या ट्रॅक्‍टरची किंमत तीन लाख 90 हजार ते चार लाख पाच हजारपर्यंत आहे.

स्वराज्य 717 : स्वराज्य 717 हा मिनी ट्रॅक्टरचे उत्तम मॉडेल आहे. जो विश्वसनीय आणि शेतकऱ्यांना वापरण्यास सोईस्कर आहे. स्वराज्य 717 मिनी ट्रॅक्टर 15 एचपी पॉवरसह 2300 आरपीएममध्ये उपलब्ध आहे. ड्राय डिस्क ब्रेक हे या ट्रॅक्‍टरची उत्तम वैशिष्ट आहे. त्याची हायड्रोलिक क्षमता 780 किलो आणि व्हील ड्राईव्ह 2डब्लूडी आहे. या स्वराज्य कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये सहा फॉरवर्ड आणि रिव्हर्स गिअर बॉक्सच्या स्वरुपात गिअर शिफ्ट ऑपरेट करणे सोपे आहे. या ट्रॅक्‍टरची किंमत मिनी ट्रॅक्टर श्रेणीतील सर्वात किफायतशीर आहे.