MSP of Rice: भाताच्या हमीभावात यंदा फक्त 117 रुपयांची वाढ; सरकारने फेरविचार करावा अशी शेतकऱ्यांची मागणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: किमान आधारभूत किंमत (MSP of Rice) खरेदी योजनेअंतर्गत यावर्षी भाताला प्रति क्विंटल 2,300 रुपये हमीभाव शासनाने (Government)  जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त117 रुपये इतकी वाढ मिळणार आहे. भाताच्या हमीभावात (MSP of Rice) या अत्यल्प वाढीमुळे शेतकऱ्यात नाराजीचे सूर आहे.

गेल्यावर्षी भाताला 2183 रुपये हमीभाव (MSP of Rice) देण्यात आला होता. यंदा तो 2,300 रुपये देण्यात आला आहे. गेल्या वर्षी असमाधानकारक पाऊस असतानाही रायगड जिल्ह्यात खरिपासाठी (Kharif Rice) 6 लाख 51 हजार क्विंटल भातपिकाची विक्री शेतकऱ्यांनी केली होती. यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस पडल्याने भाताचा उतारा (Rice Production) चांगला होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यात भात खरेदी (Rice Procurement) अद्याप सुरू झालेली नाही. पिकामध्ये पाण्याची आर्द्रता कायम असल्याने काही दिवस पीक उन्हामध्ये सुकावे लागणार आहे. यानंतर रायगड जिल्ह्यात २८ भात खरेदी-विक्री केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी करून भात खरेदी सुरू केली जाणार आहे.

किमान आधारभूत किंमत (MSP of Rice) खरेदी योजनेअंतर्गत शासनाने या वर्षासाठी सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रति क्विंटल 2,300 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यात अ दर्जाच्या भाताच्या किमतीत साधारण 20 रुपयांचा फरक असणार आहे. तसेच, या वर्षीही राज्य शासनाकडून अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कमदेखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. बोनसची रक्कमही अत्यल्प असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

भात विक्रीसाठी आगाऊ ऑनलाइन नोंदणी (Online Registration For Rice)

ज्या शेतकऱ्यांना भाताची विक्री शासकीय खरेदी केंद्रावर करायची आहे, त्या शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून देण्यात आली आहे. त्यातून चांगला मोबदला मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र 2,300 रुपयांचा हमीभाव (MSP of Rice) जाहीर झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ही वाढ अत्यल्प आहे. शासनाने हमीभावबाबत फेरविचार करायला हवा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!