Mint Farming : पुदिना शेती शेतकऱ्यांसाठी छपाईचे मशीन; पहा ‘किती’ मिळते उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी सध्या पारंपरिक शेतीला (Mint Farming) मूठमाती देत, नगदी पिकांच्या शेतीकडे वळत आहेत. यात प्रामुख्याने अनेक शेतकरी पुदिना शेती (Mint Farming) करताना दिसत असून, केवळ तीन महिन्यांमध्ये लाखाची कमाई करत आहेत. औषधी गुणधर्मांमुळे पुदिन्याच्या तेलाला विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. पुदिन्याच्या तेलाची किंमत ही सामान्यपणे 1200 ते 1800 रुपये प्रति किलोच्या दरम्यान असते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मोठा हातभार लागत आहे.

कोरोना महामारीनंतर जगभरात आयुर्वेदिक प्रॉडक्टस आणि आयुर्वेदिक औषधांची (Mint Farming) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता शेतकरी मोठ्या पुदीना, कोरफड यांसारख्या आयुर्वेदिक शेती पिकांचा पर्याय निवडत आहेत. विशेष म्हणजे आयुर्वेदिक पिकांच्या शेतीतून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तीन पटीने अधिक उत्पन्न मिळत आहे. भारत पुदिना तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे.

कधी करावी लागवड (Mint Farming In India)

पुदिना शेतीला चांगल्या पद्धतीने प्रति आठ दिवसांनी पाणी देण्याची आवश्यकता असून, त्याची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान केली जाते. योग्य वेळी लागवड केल्यास केवळ तीन महिन्यांमध्ये पीक काढणीला येते. अर्थात जून महिन्यात पहिली काढणी सुरु होते. मातीचा पी.एच. 6 ते 7.5 असलेल्या जमिनीमध्ये पुदिना पीक चांगले बहरते. एका हेक्टरमध्ये साधारणपणे पुदिना लागवडीतून 125 ते 150 किलो तेल मिळते.

किती येतो उत्पादन खर्च

पुदिना हे नगदी पीक असून, त्याचा उत्पादन खर्च हा खूपच कमी असतो. एकरी लागवडीसाठी साधारणपणे 20 ते 25 हजारांचा खर्च येतो. पुदिना पीक साधारणपणे 90 ते 110 दिवसांमध्ये काढणीला येते. काढणीनंतर प्रामुख्याने एकरी एक लाखापर्यंतचे उत्पन्न मिळते. उत्पादन खर्च वजा करुन एकरी सुमारे 75-80 हजार रुपये शिल्लक राहतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून पुदीना शेतीला हिरवे सोने म्हणून संबोधले जाते.

पुदिना लागवडीमुळे जमिनीचा पोतही सुधारतो. त्याची लागवड प्रामुख्याने उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब या राज्यांमध्ये केली जाते. परंतु, यूपीतील बदायूँ, रामपूर, मुरादाबाद, बरेली, पीलीभीत, बाराबंकी, फैजाबाद, आंबेडकर नगर, लखनऊ इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. देशातील एकूण पुदिना तेल उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन हे एकट्या उत्तरप्रदेश राज्यात होते. मात्र, सध्या महाराष्ट्रातही शेतकरी सध्या पुदिना शेतीची कास धरत मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!