यशोगाथा: उच्चशिक्षित तरुणीने आधुनिक शेतीकरून, गावातील अनेक महिलांना दिला रोजगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । पॉलीहाऊसच्या माध्यमातून शेती करून, गावातीलच अनेक महिलाना रोजगार मिळवून देणाऱ्या वैष्णवी देशपांडे यांच्या शेतीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. परभणीच्या तरुणीने नेदरलॅंडची मिरची भारतामध्ये घेतली आहे. कोरोनाच्या काळात जॉब मिळवणं अवघड होऊन गेले होते. अशा बेकारीच्या अवस्थेत असलेल्या शेकडो तरुण-तरुणींपैकी परभणी जिल्ह्यातली वैष्णवी देशपांडे देखील एक होती. वैष्णवीने एम. ए. इतिहास शिक्षण केले आहे. शिक्षण झाल्यावर पीएचडी करावी किंवा कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू व्हावे असे तिचे स्वप्न होते. पण लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज आणि विद्यापीठ बंद पडले. बेकार म्हणून अजून आणखी किती काळ थांबणार? स्वतःच काहीतरी सुरू करावं, असं वैष्णवीला सतत वाटत होतं. त्यावर विचार करून तिने शेतीमध्ये प्रयोग करण्याचे ठरवले.

वैष्णवीने आपल्या गावातच पॉलीहाऊस टाकून सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली. रासायनिक खतांमुळे आरोग्य धोक्यात येण्याची चर्चा आहे. अशावेळी सेंद्रीय शेती ही वरदान ठरू शकते याचा विचार करून तिने शेंद्रियं शेती करण्याचा विचार केला. सोनपेठ तालुक्यातील शेलगावमध्ये वैष्णवीच्या वडिलांची सहा एकर शेती आहे. त्याच ठिकाणी वैष्णवीने 10 गुंठ्यामध्ये पॉलीहाऊस उभं केलं आहे. हा प्रवास अतिशय खडतर होता आणि इतक्या कष्टातून तिने ते उभे केले आहे अशी भावना तिने व्यक्त केली आहे.

पॉलीहाऊस उभारून लेट्युस, शिमला मिर्ची आणि ब्रोकोली अशा भाज्यांचं उत्पादन घेतलेल्या भावाकडे जाऊन तिने भावाकडून मार्गदर्शन घेतले. मग शेलगावला आल्यावर तिने सर्व गोष्टींची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. वडिलांनीही तिला मात करण्यास सुरुवात केली. मग भावाच्या मार्गदर्शनाखाली तिने 10 गुंठ्यावर पॉलीहाऊस उभं केलं. महिलांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार यामुळे मिळाला आहे. पॉलीहाऊस तयार करण्यापासून ते त्यात चरे तयार करणं, पीक घेणं ते काढणे या सर्व गोष्टी इथे महिलाच करतात.”व्यवसाय म्हटलं तर कमी अधिक प्रमाणात नफा-तोटा ठरलेलाच असतो. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे माझं आर्थिक नुकसान झालं आहे पण भविष्यात हीच परिस्थिती कायम राहणार नाही. पुढे चालून लेट्युस, ब्रोकोली असं पीक घेण्याचं माझ्या मनात आहे. काही फुलं किंवा औषधी वनस्पती देखील घेता येऊ शकते, ही तर केवळ सुरूवात आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे”, असे वैष्णवी आत्मवविश्वाने सांगत असते. वैष्णवीच्या या धाडसाचा आणि कर्तृत्वाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Leave a Comment

error: Content is protected !!