शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी मोदी सरकार कटिबद्ध : अमित शाह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भोपाळ येथे नाफेड तर्फे ‘कृषी विपणनातील सहकारी संस्थांची भूमिका’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे वक्तव्य देशाचे सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केलं.

यावेळी बोलताना शहा म्हणाले, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी कृषी उत्पादनांच्या विपणनामध्ये अत्याधुनिक प्रणाली आणण्यासाठी अनेक पावले उचलली. राष्ट्रीय कृषी बाजार हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ई-नाम पोर्टलवर आतापर्यंत 2 लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाला ई -नाम च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो आहे. 18 राज्यातील एक हजाराहून कृषी उत्पन्न बाजार समित्या ई-नाम पोर्टलवर जोडल्या गेल्या आहेत. असे शहा म्हणाले.

देशात कृषी क्षेत्रात एक मजबूत विपणन व्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे. नाफेडबरोबर राज्य, जिल्हा आणि तहसील यांना देखील विपणन व्यवस्थेली जोडावं लागणार असल्याचे अमित शाह म्हणाले. एक वेगळं मॉडेल आपल्याला तयार करावं लागणार असल्याचे शाह म्हणाले. मोदी सरकार प्राथमिक कृषी पतसंस्था बहुउद्देशीय बनवत आहे. PACS ते APEX पर्यंत मजबूत विपणन प्रणालीसाठी लवकरच एक मॉडेल कायदा आणला जाईल अशी माहिती देखील शाह यांनी दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!